हिमायतनगर चाकू हल्ला प्रकरणी दोघांवर झाले परस्पर विरोधी गुन्हे दाखल – NNL
नांदेड| हिमायतनगर शहरातील चाकू हल्ला प्रकरणी दोन्ही जखमींवर नांदेड येथे उपचार सुरु असल्याने पोलिसांनी खागजी रुग्नालयात जाऊन दोघांचे जवाब घेऊन दिलेल्या फिर्यादीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. एकूणच हिमायतनगर शहरात घडलेल्या चाकू हल्ल्याचा प्रकार तुम्ही आमची बदनामी का...? करता आणि जुन्या राजकीय वादावरून घडली असल्याचे पोलीस डायरीवरील नोंदीवरून समोर आले आहे. दरम्यान आज माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी परमेश्वर मंदिरासमोर जमा होऊन मुख्य रस्त्याने मोर्चा काढून पोलीस ठाण्यात तासभर ठिय्या आंदोलन करून मागण्याचे निवेदन पोलिसांना दिले.
याबाबत सविस्तर पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी कि, चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कुणाल पि. रामराव राठोड वय 40 वर्ष व्यवसाय आरामशीन रा. बाजार चौक, ता. हिमायतनगर जि नांदेड मो क्रंमाक ९४२२४३...
