नांदेड| नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रांविरोधात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-२’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १ ते १५ ऑगस्ट या पंधरवड्यात परिक्षेत्रात ८५३ कारवाया करून १,३१५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



या कारवायांमध्ये आरोपींकडून तब्बल ७ कोटी ९७ लाख ६१ हजार ७२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटखा, मटका-जुगार, दारूबंदी कायदा, शस्त्र अधिनियम तसेच इतर कायद्यांनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.



परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या. नांदेड जिल्ह्यात २४२, परभणीत २१२, हिंगोलीत १८७ तर लातूर जिल्ह्यात २१२ कारवाया करण्यात आल्या.



| जिल्हा | गुटखा | मटका/जुगार | दारू | शस्त्र अधिनियम | इतर |
|---|---|---|---|---|---|
| नांदेड | 9 | 47 | 126 | 14 | 46 |
| परभणी | 4 | 42 | 151 | 2 | 13 |
| हिंगोली | 2 | 35 | 118 | 6 | 26 |
| लातूर | 3 | 48 | 132 | 4 | 25 |
| एकूण | 18 | 172 | 527 | 26 | 110 |
यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सर्वाधिक ५२७ कारवाया, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये १७२ कारवाया, तर इतर कायद्यांखाली ११० कारवाया करण्यात आल्या. गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम १२३ भारतीय न्याय संहितेनुसार १८, तर शस्त्र अधिनियमांतर्गत २६ कारवाया झाल्या आहेत.

