HomeBlogनागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या व्दितीय साप्ताहिक विशेष रेल्वे २९...

नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या व्दितीय साप्ताहिक विशेष रेल्वे २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

नागपूर। कोकण ते खान्देश विदर्भ मध्य रेल्वेकडून (Periodicity) प्रायोगिक तत्त्वावर कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणारी गाडी क्र ०११३९/४० नागपुर मडगाव (गोवा)दरम्यान धावणाऱ्या  द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. आता विदर्भ ते कोकण चालणारी ही गाडी २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे.

खान्देश,विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ०११३९/०११४० नागपुर जं ते मडगाव ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी आता २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडीक्र.०११३९ नागपुर जं येथून दर बुधवार,शनिवारी दु.०३.०६ वाजता सुटून गुरुवार,रविवारी मडगाव गोवा दुसऱ्या दिवशी सायं ०५.४६ वाजता पोहोचेल.

०११४० मडगाव गोवा ते नागपुर जं दरम्यान धावताना हि गाडी गुरुवार,रविवारी मडगाव गोवा येथून रा.०८.०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३१ वाजता नागपुर जं येथे पोहोचेल नागपुर जं. ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जं,पुलगाव, धामणगाव,बडनेरा जं, अकोला जं,शेगांव, मलकापूर,भुसावळ जं,नाशिक रोड, ईगतपुरी,कल्याण जं,पनवेल जं,रोहा,माणगांव, खेड, चिपळूण,संगमेश्वर रोड,रत्नागिरी,राजापूर रोड,कणकवली, कुडाळ,थिवीम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत या विशेष रेल्वेच्या दोन्ही बाजुच्या मिळुन ५४ फेऱ्या होणार आहेत या रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण www.enquiry.indianrail.gov.in,www.irctc.gov.in व NTES ॲपवर भारतीय रेल्वेच्या आरक्षण दि.३० जुन २०२४ पासुन आरक्षण खिडकीवर सुरु करण्यात आले आहे.

IMG 20240630 WA0028 नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या व्दितीय साप्ताहिक विशेष रेल्वे २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

०११३९/०११४० नागपुर जं मडगाव नागपुर जं प्रतिक्षा व्दितीय साप्ताहिक एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष सुनिल उत्तेकर,पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष यशवंत परब,राष्ट्रीय रेल्वे सल्लागार समिती शेगांव सल्लागार व सदस्य ॲड.श्री. पुरुषोत्तम डांगरा संजय त्रिवेदी ,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.सौ.शबनम शेख सौ.माधुरी शर्मा, राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले, राष्ट्रीय संघटनमंत्री-देवगड संपर्कप्रमुख ओमकार उमाजी माळगांवकर,कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी,दापोली तालुकाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख नागेश मयेकर,मंडणगड तालुकाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख संदेश गांधी, प्रवासी सुधीर राठोड-अनिल राठोड-दिपक सोनवणे-सुधाकर राठोड, विदर्भ-खान्देश कृषी विद्यापीठ-मेडिकल कॉलेजातील विद्यार्थी विद्यार्थीनी-प्राचार्य वर्गाकडून करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments