उमरखेडहिंगोली

नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू एक अत्यवस्थ -NNL

उमरखेड, अरविंद ओझलवार। धुणे धुतल्यानंतर पैनगंगा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू तर एक अत्यवस्थ झाल्याने त्याला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. ही दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर गावाजवळील पैनगंगा नदीपात्रात आज दि . 26 जून रोजी दुपारी १२ ३० वाजता चे दरम्यान घडली. या घटनेने सावळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे .

IMG 20240626 WA0041 नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू एक अत्यवस्थ -NNL

अवंतिका राहुल पाटील वय 13 सावळेश्वर , कावेरी गौतम मुनेश्वर वय 15 रा बाभळी ता हदगाव , चैतन्य देवानंद काळबांडे वय 17 रा सावळेश्वर असे मृतकाचे नाव असुन शुभम सिद्धार्थ काळबांडे वय 22 रा सावळेश्वर हा अत्यवस्थ असल्याने त्याला उपचारासाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे .

IMG 20240626 WA0040 नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू एक अत्यवस्थ -NNL

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या पलीकडल्या काठावर सावळेश्वर गाव आहे, या गावाजवळील नदीपात्रात धुणे धुण्यासाठी अवंतिका पाटील व कावेरी मुनेश्वर ह्या दुपारी गेल्या होत्या. धूने धुतल्यानंतर पोहण्यासाठी त्या नदीपात्रात गेल्या पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या बुडू लागल्या. त्यावेळी नदीपात्राच्या काठावर उभे असलेल्या चैतन्य काळबांडे व शुभम काळबांडे यांनी त्यांना वाचवण्यासाठी नदीत उड्या मारल्या .परंतु त्यांना सुद्धा पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी नदी पात्रावर उभे असलेल्या महिलांनी गावाकडे धाव घेत आरडाओरड केली.

IMG 20240626 WA0039 नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू एक अत्यवस्थ -NNL

त्यानंतर तिथे विवेक रावते , शेख अजीम यांच्यासह दहा ते पंधरा युवकांनी येऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये कावेरी मुनेश्वर ही जागेवरच मृत झाली होती तर अवंतिका व चैतन्य यांना ढाणकी येथे उपचारासाठी आणत असताना त्यांचा मृत्यू झाला .तर शुभम काळबांडे हा अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले .मृतकामधील कावेरी गौतम मुनेश्वर ही मामाच्या घरी पाहुणे म्हणून आली असताना तिचा दुर्दैवी अंत झाला . या घटनेने सावळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे .

IMG 20240626 WA0038 नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू एक अत्यवस्थ -NNL

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!