Homeमहाराष्ट्रAnimal and Bird Exhibition : परळी वैजनाथमध्ये अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन

Animal and Bird Exhibition : परळी वैजनाथमध्ये अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई | बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे दि. १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अखिल भारतीय स्तरावरील पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात देशातील विविध राज्यांमधून एक हजाराहून अधिक उत्कृष्ट पशुपक्षी सहभागी होणार असून, पशुपालकांसाठी हे प्रदर्शन एक महत्त्वाचे ज्ञान व अनुभवाचे व्यासपीठ ठरणार आहे.

या प्रदर्शनात गायी, म्हशी, घोडे, शेळ्या, मेंढ्या तसेच विविध देशी-विदेशी पक्ष्यांच्या प्रजाती पाहण्याची संधी मिळणार आहे. आधुनिक पशुपालन पद्धती, संतुलित आहार, रोगप्रतिबंधक उपाययोजना आणि पशुधन व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

राज्य पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी भव्य मैदानाची उभारणी तसेच पशुधनासाठी आवश्यक पाणी, निवारा व आरोग्य सुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

“या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुपालकांना अद्ययावत तंत्रज्ञान, सुधारित पशुधन आणि शाश्वत पशुपालनाची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम होण्यास मदत होईल,” असे प्रतिपादन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले.

बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील व देशातील पशुपालकांनी या तीन दिवसीय अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments