Animal and Bird Exhibition : परळी वैजनाथमध्ये अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई | बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे दि. १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अखिल भारतीय स्तरावरील पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात देशातील विविध राज्यांमधून एक हजाराहून अधिक उत्कृष्ट पशुपक्षी सहभागी होणार असून, पशुपालकांसाठी हे प्रदर्शन एक महत्त्वाचे ज्ञान व अनुभवाचे व्यासपीठ ठरणार आहे.
या प्रदर्शनात गायी, म्हशी, घोडे, शेळ्या, मेंढ्या तसेच विविध देशी-विदेशी पक्ष्यांच्या प्रजाती पाहण्याची संधी मिळणार आहे. आधुनिक पशुपालन पद्धती, संतुलित आहार, रोगप्रतिबंधक उपाययोजना आणि पशुधन व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
राज्य पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी भव्य मैदानाची उभारणी तसेच पशुधन...
