HomeनांदेडMahakali Yatra : कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६...

Mahakali Yatra : कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ ला भव्य शोभायात्रेने सुरुवात

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यातील मौजे कोतलवाडी (सरसम बु.) येथील श्री महाकाली देवीचा वार्षिक यात्रा महोत्सव २०२६ मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होणार असून, या महोत्सवाची सुरुवात हलगीच्या गजरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक उत्सव परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा व आस्थेचे केंद्र ठरणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पूर्वसंध्येला, दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, कोतलवाडी येथून सरसम (बु.) येथे जाऊन परत येणारी पालखी मिरवणूक हलगीच्या तलावर निघाली. रात्री ८ वाजता पोतराज व देवकरीन यांचे भक्तिमय कार्यक्रम सादर करण्यात आला. दिनांक 09 रोजी श्री महाकाली देवीचा अभिषेक अजयराव अनंतराव देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य यात्रा दिनी सकाळी ९ वाजता, श्री महाकाली देवीची भव्य शोभायात्रा, पूजन व अन्य धार्मिक विधी पार पडणार आहेत. या कार्यक्रमास हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव व परिसरातील असंख्य भाविक उपस्थित राहणार आहेत.

IMG 20260108 WA0071 Mahakali Yatra : कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ ला भव्य शोभायात्रेने सुरुवात

या महोत्सवाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी, कोतलवाडी व रामनगर तांडा यांच्या सहकार्याने करण्यात आले असून, युवक मंडळ कोतलवाडी व महिला मंडळ व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष श्री भोजराज दगडु वारकड यांच्यासह सर्व पदाधिकारी, पुजारी, पोतराज व देवकर मंडळी यांचे विशेष योगदान लाभत आहे. श्री महाकाली देवीच्या कृपेने हा यात्रा महोत्सव शांतता, भक्तिभाव व उत्साहात पार पडावा, अशी भावना व्यक्त होत असून, परिसरातील भाविकांमध्ये या धार्मिक सोहळ्याबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. या धार्मिक उत्सवात सरसम पंचक्रोशी नगरीतील भाविक भक्तांनी उपस्थित होऊन लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

IMG 20260108 WA0068 Mahakali Yatra : कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ ला भव्य शोभायात्रेने सुरुवात

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments