उस्माननगर l बीलोली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे विभागस्तरीय भूमिका अभिनय आणि लोकनृत्य अशा दोन्ही स्पर्धेत विद्यार्थ्यांनीनी व्दितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.


दि.15 ऑक्टोंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2025- 26 अन्वये भूमिका अभिनय व लोकनृत्य विभागस्तरीय स्पर्धेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरूड,जि.लातूर द्वारे विद्या विकास माध्यमिक विद्यालय लातूर येथे करण्यात आले होते.


विद्यार्थीनींनी भूमिका अभिनय स्पर्धेत ‘ मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्व ‘ या विषयावर विद्यार्थीनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.त्यामध्ये कु.अनिता दत्ता मंडगे, पुनम रामदास जरदेवाड, पूजा दिगंबर देवकरे, वैष्णवी शिवाजी रेडेस,रोशनी माधव जामनोर इ.विद्यार्थीनींचा सहभाग होता.


तसेच विद्यार्थीनींनी लोकनृत्य स्पर्धेत ‘ लिंग समानता ‘ या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्यामध्ये कु.रमाई संदीप कांबळे, श्रावणी दिगंबर वाघमारे, मनीषा यादव जेठे,अनुष्का उत्तम शेरे, प्रतीक्षा प्रमोद बेलेकर,पल्लवी राजू गायकवाड इत्यादी विद्यार्थीनींचा सहभाग होता.
दोन्ही स्पर्धेसाठी तज्ञ मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती आश्विनी कोतवाड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. अश्विनी कोतवाड या विद्यार्थीनींना स्पर्धेसाठी सातत्याने मार्गदर्शन करतात त्यामुळे सलग चौथ्या वर्षीही विभागस्तरावर विद्यार्थीनींच्या सुप्त कलागुणांना संधी मिळाली आहे.

विद्यार्थीनींच्या यशाबद्दल जि.प.नांदेडचे मा.शिक्षणाधिकारी(मा) श्री.माधव सलगर साहेब,मा.शिक्षणाधिकारी प्रा.वंदना फुटाणे मॅडम, डायट नांदेड येथील मा.प्राचार्या श्रीमती मंजुषा औंढेकर मॅडम,मा. अधिव्याख्याता श्री.प्रकाश शिरसे सर मा.गटशिक्षणाधिकारी श्री. बालाजी पाटील साहेब,केंद्रप्रमुख बिलोली श्री.जयवंत काळे सर, जिल्हा समन्वयक सौ.सविता अवातिरक मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती गजरा सावळे, विषयतज्ञ श्री.प्रल्हाद ढाकणे, श्री.गुणवंत हलगरे व सुरेश राठोड, शिक्षक श्री.रेड्डी सर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मार्गदर्शक शिक्षिका सौ.अश्विनी कोतवाड व विजेत्या विद्यार्थीनींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


