नांदेड| प्रत्येक माया बहिणींना आपले बाळ कलेक्टर व्हावे, न्यायाधीश व्हावे, उच्च विद्याविभूषित व्हावे, एवढेंच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान व्हावे असे डोहाळे लागायला पाहिजे. आणि या गावातील विश्र्वशांती बुद्ध विहाराच्या परिसरात ग्रंथालय होवून त्या माध्यमातून लाल दिव्याच्या गाड्यांमध्ये बसणारे अधिकारी तयार होवोत या अपेक्षा व्यक्त केल्या. ते अश्विन पौर्णिमेनिमित्त वर्षावास समापण सोहळ्यामध्ये विश्र्वशांती बुद्ध विहार जवळा दे येथे धम्मदेसना देत होते.


यावेळी सकाळी अकरा वाजता धम्म ध्वजारोहण साहेब सखाराम शिखरे यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर बुद्ध पुजा पाठ करण्यात आले. त्यानंतर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे क्रमशः वाचन करुन समाप्ती करण्यात आली. यावेळी वाचक सुचक सरिता श्रावण गच्चे,भिमराव चांदु गोडबोले , गुणवंत बालाजी गच्चे , मिलिंद बाबुराव गोडबोले, किशन गोविंद गच्चे, रोहिदास नागोराव गोडबोले, साक्षी पांडुरंग गच्चे व भारतीय बौद्ध महासभेचे जि.संरक्षन सचिव तथा आकाशवाणी प्रासंगिक निवेदक आनंद पुरभाजी गोडबोले आणि उपोसथ धारक सुलोचनाबाई गच्चे, मनिषा गच्चे, प्रज्ञा गोडबोले,सरिता श्रावण गच्चे,वैजंताबाई गोडबोले, दिपाली गच्चे ,त्रिशला गोडबोले ,मयुरी गोडबोले तसेच चंद्रकला हाटकर , कैलास गोडबोले ,मिलिंद बा. गोडबोले,आनंद पु. गोडबोले ,रत्नदीप गच्चे ,भिमराव गोडबोले ,आतुल गच्चे आणि साहेब शिखरे यांचा सुंदरबाई पुरभाजी गोडबोले व वसंत नारायणराव शिखरे यांच्या परिवाराकडुन शुभ्र वस्त्रदान करून सन्मान करण्यात आला.



सायंकाळी ७:३० वा. पुज्य भिक्खु महाविरो यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर बुद्ध विहारात अभिवादन करून, त्रिशरण पंचशीलासह परित्राण व धम्मदेसना दिली. नंतर शिखरे परिवाराकडून चिवरदान,फलदान, आर्थिक दान दिले. तर उपासक उपासिका यांना भोजन दान दिले. तर सुशिल गंगाधर गवळी (सहा.कक्ष अधिकारी मंत्रालय) यांनी विश्र्वशांती बुद्ध विहारास १०० खुर्ची दान केली. यावेळी सरपंच प्र. माधव पावडे, राहुल सखाराम गवळी, प्रल्हाद रंगराव मोरे, वसंतराव शिखरे तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा, तालुका, ग्राम शाखा पदाधिकारी यांच्या सह परिसरातील श्रध्दावान उपासक उपासिका व बालक बालिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.




