नांदेड l नायगाव तालुक्यात यावर्षी निसर्गाचा मोठा महाप्रलय झाला असून त्यामध्ये सर्व घटकांचे खूप मोठे नुकसान झाले असून त्यात शेतकरी माय-बापाची जमीन खरडून गेली असून शासन नियमाने खरडून गेलेल्या जमिनी ह्या पोट खरांब मध्ये नोंद घेतात त्यामुळे ती अट यावर्षी पुरती शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे गजानन पाटील होटाळकर यांनी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.


यावर्षी पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीत गोटे शिल्लक राहिल्याने स्वतः तहसीलदार यांनी पाहणी दरम्यान पहिले आणि शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान दिले तरी पण ती शेती पूर्वता होणार नाही आणि नुकसान भरून निघणार नाही.

पण यावर्षी जवळपास हजारो हेक्टर जमीन खरडून गेली त्यात शासनाची असलेली जाचक अट असलेली सातबारा वरती पोट खराब नोंद घेण्यात येऊ नये त्यासाठी तात्काळ आपल्या स्तरावरून नियोजन करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी होटाळकर यांनी केली.कारण चांगल्या शेतीचे नुकसान होऊन शेती खरडून जाऊन पण चांगली शेती पोट खराब मध्ये जाईल म्हणून शेतकरी बांधव चिंतेत आहेत तरी प्रशासनाने याबाबत शेतकरी हिताचा निर्णय घेऊन दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.


यावेळी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे गजानन पाटील होटाळकर, सुधीर पाटील पवार, सुशील पवार, दिग्विजय गायकवाड, उमाकांत हिवराळे, गंगाधर हिवराळे, अंकुश सरपाळे, भिमराव जिगळेकर, व्यंकटी जाधव, बालाजी जाधव, रघुनाथ जाधव, ज्ञानेश्वर जाधव, शंकर ताटे मुगाव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


