श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील गोंडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक संतोष शेषराव गंधे यांना शैक्षणिक क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याने गोंडवाडी गावाचे समस्त गावकरी व शालेय व्यवस्थापन समिती यांनी सत्कार सोहळा आयोजित करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकी द्वारे गावात हृदय सत्कार केला.


यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच, व्यवस्थापन समिती, सहकारी शिक्षक,ज्येष्ठ नागरिक, पालक व विद्यार्थ्यांनी मनोगत मांडताना“गुरु म्हणजे समाजाच्या भवितव्याचा शिल्पकार, ज्ञानदीप प्रज्वलित ठेवणारा तेजस्वी दीपस्तंभ”अशी उपाधी गंधे सरांना दिली. सत्कारानंतर संतोष गंधे यांनी सांगितले की,“विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे.गावकऱ्यांचे सहकार्य आणि मुलांचे प्रेम हेच माझे खरे बळ आहे. हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण गावाचा आहे.” असे सांगितले.


शिक्षणावर श्रद्धा, परिश्रमांवर विश्वास आणि विद्यार्थ्यांवर प्रेम यामुळेच संतोष गंधे सरांचा प्रवास आज राज्यपातळीवर दखलपात्र ठरल्याने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे गोंडवाडी गावासह माहूर तालुका शिक्षण विभागाच्या मनात शिरपेचाचा तुरा रोवला गेला आहे. यावेळी प्रकाश बावणे. वाघमारे सर. संदिप तोडसाम. संजय सिद्धेवार. रूपाली बावणे. विष्णु बावणे. विमलबाई पुरके. विनोद बावणे. निलेश कातले. राजु मेश्राम. जंगोबाई तोडसाम. अनुपमा मेश्राम. मनोज मेश्राम. कल्पना पुरके. लैलाबाई तोडसाम. मिनाबाई मेश्राम. अश्विनी कातले. दिपाली बावणे यांचेसह गावकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




