श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठा पैकी एक पुर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरिल श्री रेणूकादेवीच्या नवरात्र उत्सवास सोमवार दि,२२ सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे. श्री रेणूकामातेला दहा दिवस वेगवेगळ्या रंगाच्या पैठणी महावस्त्र नेसविण्यात येणार आहे अशी माहिती श्री रेणूकादेवी संस्थानचे विश्वस्थ चंद्रकांत भोपी ,संजय कान्नव, अरविंद देव, दुर्गादास भोपी,यांनी दिली आहे.श्री रेणूकादेवीचा नवरात्र उत्सव भाविकांसाठी पर्वनीच असतो.



दहा दिवस सह्याद्रीच्या डोंगररांगात आई भवाणी श्री रेणूकादेवीचा गजर ऐकावयास मिळतो. जिकडे- तिकडे भक्तीमय वातावरण पहावयास मिळते. नवरात्र उत्सवाची श्री रेणूकादेवी संस्थान विश्वस्थ समितीने जय्यत तयारी केली आहे. भाविकांना केंद्रबिंदु मानुन सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याची माहीती पद्दसिध्द कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप यानी दिली आहे.


सुलभ दर्शनासह आलेल्या प्रत्येक भाविकासाठी महाप्रसाद व फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहीती , संजय काण्णव,यांनी दिली आहे. नवरात्र उत्सवात देवीला घटस्थापणे ला- पिवळ्या रंगाची पैठणी, आज द्वितीया-हिरवा,तृतीया – राखाडी, पैठणी, चतुर्थी – फिक्की राखाडी पैठणी, पंचमी – पाढरा मोतीकलर पैठणी, षष्ठी – लाल पैठणी, सप्तमी -निळी पैठणी, अष्टमी -गुलाबी पैठणी, नवमी -जांभळी पैठणी महावस्त्र दशमी- अंबाकलर सोनेरी देवीला नेसविव्यात येणार आहे.


सदरिल पैठणी भार्गव राजे नांदेड माननी महावस्त्र येवला येथून खरेदी केले आहेत. त्यामुळे दररोज भाविकांना देवीची वेगवेगळी महावस्त्रे पहावयास मिळणार आहेत. नवरात्र उत्सवास दि,२२रोजी प्रारंभ झाला असून समाप्ती विजयादशमीला ता.२ आक्टोबर रोजी होणार आहे अशी माहिती सह्हायक व्यवस्थापक नितिन गेडाम यांनी दिली आहे.



