Mahur Renuka Navratrotsav : श्री रेणूकादेवी साठी दहा पैठणी महावस्त्र नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसात दहारंगी महावस्त्र
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठा पैकी एक पुर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरिल श्री रेणूकादेवीच्या नवरात्र उत्सवास सोमवार दि,२२ सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे. श्री रेणूकामातेला दहा दिवस वेगवेगळ्या रंगाच्या पैठणी महावस्त्र नेसविण्यात येणार आहे अशी माहिती श्री रेणूकादेवी संस्थानचे विश्वस्थ चंद्रकांत भोपी ,संजय कान्नव, अरविंद देव, दुर्गादास भोपी,यांनी दिली आहे.श्री रेणूकादेवीचा नवरात्र उत्सव भाविकांसाठी पर्वनीच असतो.
दहा दिवस सह्याद्रीच्या डोंगररांगात आई भवाणी श्री रेणूकादेवीचा गजर ऐकावयास मिळतो. जिकडे- तिकडे भक्तीमय वातावरण पहावयास मिळते. नवरात्र उत्सवाची श्री रेणूकादेवी संस्थान विश्वस्थ समितीने जय्यत तयारी केली आहे. भाविकांना केंद्रबिंदु मानुन सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याची माहीती पद्दसिध्द कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप यानी दिली आहे.
...
