कृषी कन्यांचे शेतकऱ्यांना बीयाणे उगवण क्षमत्ता संदर्भात मार्गदर्शन; माझा एक दिवस माझ्या बळीरा‌जासाठी उपक्रम -NNL

उमरखेड, अरविंद ओझलवार। डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्या अंतर्गत कृषी महावि‌द्यालय उमरखेड येथील कृषी कन्यांनी बियाणे उगवण क्षमता संदर्भात उमरखेड तालुक्यातील बेलखेड या गावात शेतकत्यांना मार्गदर्शन केले.

घरी साठवलेले किंवा बाजारातून विकत आणलेले बियाणे पेरणीसाठी वापरायचे असल्यास प्रथम बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करणे आवश्यक आहे. बियाण्यांची पुनर्पेरणी टाळण्यासाठी बीज उगवण प्रक्रिया करणे आवश्यक आहे, बियाण्यांच्या उगवण क्षमता तपासणी अंती उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी आढळून आल्यास जेवढ्या प्रमाणात उगवण शक्ती कमी आहे.

तेवढ्या प्रमाणात प्रती हेक्टरी जास्तीचे बियाणे पेरणी करिता वापरावे हे पटवून देण्यासाठी कृषी महा‌विद‌यालय उमरखेड येथील विद्यार्थिनी वैष्णवी शिंदे ,भारती गाईगोले, राखी भोयर ,विधी चोपडे ,समृध्दी अलोडे, श्रीज्या येती यांनी गोणपाठ या सरळ व सोप्या पध्दतीने बियाणे उगवण क्षमता कसे तपासायचे हे थोडक्यात समजून सांगितले.

सदर मार्गदर्शनाकरिता महाविद‌यालयाचे प्राचार्य श्री. एस. के. चिंतले सर व वनस्पती शास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री. वाय. एस. एस. वाकोडे सर व सह समन्वयक श्री. ए. एस. राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. तसेच बेलखेड येथील प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button