धाराशिव| ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ही संघटना 1953 मध्ये वसंतराव नाईक साहेबांनी स्थापन केले असून, बंजारा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तेव्हापासून ते आज पर्यंत या संघटनेच्या अनेक लोकांनी काम केलेलं आहे. त्याच संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी बापूराव राठोड यांची निवड झाल्याबद्दल व त्याचबरोबर समाजाच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी धाराशिव जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


या बैठकीत बापूराव राठोड यांनी समाजाचे संघटन उभे करून एकत्रित समाजाच्या प्रश्नासाठी लढा उभा करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या बैठकीस यांच्यासोबत संभाजीनगरचे वित्त लेखा अधिकारी उत्तम चव्हाण, लातूर मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, भाजपा शहर उपाध्यक्ष एड. नितीन राठोड,सुनिल नायक,प्रा. प्रकाश राठोड, डॉ. विलास राठोड, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.



या बैठकीचे आयोजन धाराशिव जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजातर्फे करण्यात आले होते. या बैठकीस जिल्ह्यातील गुलाब जाधव, गुलाब राठोड, सुरज चव्हाण, शेषराव राठोड, सचिन राठोड , ऍड राज राठोड, सचिन राठोड,अविनाश चव्हाण, विजय राठोड, मोहन राठोड, शहाजी चव्हाण, राजू आडे, वैभव जाधव, हरीश जाधव, शरद राठोड व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हो.




