उस्माननगर l नुकत्याच आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखर काबीज करून तिरंगा ध्वजारोहण फडकावून मोठे धाडस करून आल्यावर उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथील सुपरिचित असलेल्या वारकड परिवारातर्फे शिखर यौध्द्या सौ.लोपामुद्रा( सुशिल ) आनेराव -कुबडे यांचा सत्कार करण्यात आला.


उस्माननगर पोलिस स्टेशनच्या विरांगणी , सपोउनि सौ लोपामुद्रा आनेराव -कुबडे या ९ ऑगस्टला आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील किलोमांजारो या शिखरावर जाण्यासाठी रवाना झाल्या होत्या. पंधरा ऑगस्टला उंच शिखरावर पोहचून तिरंगा ध्वजारोहण फडकावून नाव सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवले आहे.

नुकत्याच उस्माननगर येथे आगमन झाल्यानंतर उस्माननगर येथील भाजपचे राष्ट्रीय सदस्य तथा माजी चेअरमन,माजी सरपंच तुकाराम वारकड गुरूजी , उद्योजक बसवेश्वर वारकड , सौ. भाग्यश्री वारकड , नरेंद्र वारकड गुरूजी व परिवारातर्फे यथोचित शाल श्रीफळ पुष्पमाला अर्पण करून सत्कार करण्यात आला.यावेळी पोलिस स्टेशनचे मेजर शिवपुजे यांची प्रमुख उपस्थिती होती.



