नवीन नांदेड l भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंचक्रोशीतील नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर देवस्थान येथे श्रावणमास निमित्ताने 25 जुलै ते 23ऑगस्ट दरम्यान दैनंदिन महाअभिषेक महाआरती व महाप्रसाद आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांसाठी दर सोमवारी दर्शन सुलभ होण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आला आहे.


नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या काळेश्वर मंदिर येथे श्रावण मास निमित्ताने 25 जुलै पासून सकाळी महाअभिषेक, महाआरती दर्शनासाठी सकाळी सहा ते एक वाजेपर्यंत व दुपारी 12 ते 4 दरम्यान महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.दर सोमवारी रात्री 12ते 3 सतिश महाराज पुजारी शिवलिंग धनमणे यांच्या अधिपत्याखाली महाअभिषेक व महाआरती झाल्या नंतर भाविकांसाठी दर्शन खुले ठेवण्यात येणार आहेत.

तर दुपारी महाप्रसाद आयोजन करण्यात आले तर विश्वस्त समिती पदाधिकारी यांच्या कडून वाहनधारकांना वाहनतळ, वाहतूक व्यवस्था तसेच दर्शन रांगे साठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर सोमवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त सह गोदावरी नदी काठी जीवरक्षक दल तैनात करण्यात येणार आहेत. श्रावण मास निमित्ताने काळेश्वर मंदिर परिसरात अनेक फुल विक्रेते सह मुर्ती व खेळणी दुकाने थाटली आहेत.विष्णुपुरी ग्रामपंचायत पदाधिकारी व मंदिर विश्वस्त समिती परिश्रम घेत आहेत.



