किनवट, परमेश्वर पेशवे| राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान संकल्प समाज उपयोगी अभियान भाजपाच्या वतीने जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविले जात असताना किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट शहरात आणि इस्लापूर येथील साई मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर राबवण्यात आले.


भाजपा किनवट तालुका दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन साई मंगल कार्यालय इस्लापूर येथे केले असता या रक्तदान शिबिराला भाजपाचे ओबीसी चे जिल्हाध्यक्ष व माजी विधानसभा प्रमुख बाबुराव केंद्रे. पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड, भाजपा अनुसूचित जमाती आदिवासी सेलचे अध्यक्ष गोविंद अंकुरवाड,भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस स्वप्निल गरडे, भाजपाचे श्रीरंग पवार, भाजपा अनुसूचित जातीचे जिल्हा सरचिटणीस रवी कसबे, जिल्हा उपाध्यक्ष विवेक केंद्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सूर्यनारायण पाटील, तालुका सरचिटणीस श्रीहरी मुंडे, रमेश बोडेवाड, सतीश सोंडारे,संदीप वानखेडे कपिल बंकलवाड, पाटील, बालाजी काळे, गजानन कदम, शेख लतीफ, संग्राम बिरलकुले, विकास माहुरकर, गजानन मोहिते, गोविंद भदेवाड, बालाजी पळसपुरे. प्रवीण माहुरकर हे उपस्थित होते.


उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. या रक्तदान शिबिरामध्ये अनेक भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व तरुणांनी सहभाग घेत रक्तदान केले या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून ही रक्तदान प्रक्रिया नांदेडच्या नंदिग्राम ब्लड बँक ग्रुपने ही रक्तदान प्रक्रिया पार पाडली. इस्लापूर येथे रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती भाजपा किनवट दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर यांनीही माहिती दिली.




