देगलूर, गंगाधर मठवाले | येथील जिल्हा परिषद बाधकाम विभाग कार्यालयात. एक कार्यकारी अभियंता आणि अठरा कर्मचारऱ्याची नेमणूक करण्यात आली असता तेव्हा येथील कार्यालयात केवळ दोन ते तीन कर्मचारी उपस्थित राहतात याना वठणीवर आणण्यासाठी उध्व शिवसेनेच्या वतीने २४ रोजी आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद बाधकाम विभागाचे विभाजन करून नांदेड देगलूर भोकर असे तीन विभाग तयार करण्यात आले आहे.



देगलूरच्या जिल्हा परिषद बाधकाम विभागात काम करण्यासाठी एक कार्यकारी अभियंता व १८ कर्मचारी नियुक्ती करण्यात आले. परंतु सध्या देगलूरच्या कार्यालयात दोन तीन अधिकारी व एक दोन कर्मचारी सोडले तर उर्वरित कोणताही कर्मचारी हजर रहात नाही. सगळे अधिकारी नांदेडला राहून नांदेड कार्यालयात बसून नोकरी करतात. या सर्वांचे उपस्थिती पट देखील नांदेडलाच आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बाधकाम विभाग देगलूर अंतर्गत येणाऱ्या देगलूर मुखेड नायगाव बिलोली धर्माबाद या पाच तालुक्यातील तीनशे ते साडेतीनशे गावातील जनतेची हेळसांड होत आहे.


येत्या २२ जुलैपर्यंत देगलूर कार्यालयासाठी नियुक्ती असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी शभर टक्के उपस्थित न लावल्यास दिनांक २४ रोजी दुपारी १२ वाजता कार्यालयाच्या व प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन करून कार्यालयास टाळे ठोकण्याचा ईशारा शिवसेना उध्व ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला. आंदोलन उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बालाजी इंगळे, पांडुरंग पाटील, नागनाथ वाडेकर, संजय जोशी, रवी उल्लेवार, यांनी दिला आहे. या निवेदनाचे प्रती जिल्हा अधिकारी नांदेड उपविभाग अधिकारी देगलूर कार्यकारी अभियंता देगलूर याना देण्यात आले.




