Dr. Sangita Deshmukh ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांना एक वर्ष पूर्ण ; एक वर्ष मध्ये जिल्हात राबविले विविध आरोग्य विषयक उपक्रम

नांदेड l जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख हे जिल्हा परिषद वाशिम येथुन पदौउन्नती ने जिल्हा परिषद नांदेड येथे १६ जुलै २०२४ रोजी रोजी रुजू झाले त्याच्या कार्यकिर्दीला आज १६ जुलै २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी नांदेड जिल्हात रुजू झाले पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान या माध्यमातून आरोग्य सेवा हि गरजु अतिदुर्गम भागातील तळागाळातील गोरगरिबांना पर्यंत पोहचली पाहिजे या साठी त्यांनी विशेष नियोजन व उपक्रम जिल्हात राबवून जिल्हा राज्यात अव्वल स्थानी ठेवला आहे.

डॉ सगिता देशमुख हे ऐन पावसाळ्यात रुजू झाले त्यांनी जिल्हा मध्ये जलजन्य आजार व किटकजन्य आजार ची साथ उद्भभवणार नाही यासाठी स्टाप डायरीया प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना प्रभावीपणे जिल्हात राबविले आहे. राष्ट्रीय माता बालसगोपन कार्यक्रम अंतर्गत प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित योजना दरमहा ९ तारीख ला त्यादिवशी जिल्हात विशेष आरोग्य तपासणी शिबीर ठेवून सर्व गरोदर मातांची मोफत सर्व तपासणी करण्यात आली .

या मोहिमेत तळागाळातील अतिदुर्गम भागातील, स्थालतरीत कामगार,साखर कारखाना ऊस तोड , विट भट्टी काम करणारे गरोदर माता याची जिल्हातील आरोग्य यंत्रणा मार्फत मोफत सर्व तपासणी होतात कि नाही यासाठी स्वता डॉ सगिता देशमुख यांनी कामगार चा पालावर, विट् भेटीवर भेटी देऊन त्यांना राष्ट्रीय माता बालसंगोपन कार्यक्रमची माहिती व जनजागृती केली आहे.

तसेच आदिवासी भागात मोबाईल युनिट द्वारे अतिदुर्गम भागातील तळागाळातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी विशेष सर्व आरोग्य तपासणी शिबीराचे नियोजन करुन गरोदर माता व बालके व वयोवृद्ध याची तपासणी केली आहे त्या मध्ये राज्यात आरोग्य सेवा मध्ये दुसरा क्रमांक नांदेड जिल्हाला डॉ सगिता देशमुख यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल याचा मार्गदर्शन खाली काम केलेमुळे पुरस्कार मिळाला आहे.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे उदिष्ट पूर्ण करुन राज्यात अव्वल स्थानी नेऊन जिल्हाला सन २०२४ -२०२५ या वर्षीचा कुटुंब कल्याण कार्यक्रमत राज्यात दुसरा पुरस्कार जिल्हाला मिळवून जिल्हाचे नावलौकिक केले आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम मध्ये १०० दिवस ७ डिसेंबर २०२४ पासून विशेष तपासणी मोहीम राबवून राज्यात अव्वल स्थानी जिल्हाला मिळवून देऊन जिल्हातील ६७ ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त केले आहे.

कायाकल्प मध्ये जिल्हातील ६९ प्राथमिक आरोग्य केंद्र पैकी ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांना विशेष पहीला व दुसरा पुरस्कार मिळाले आहे. राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत घुगराळा येथे विशेष आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून तपासणी केली आहे .

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना गोल्डन कार्ड काढण्यासाठी विशेष शिबिर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पणे शिबीर आयोजित करून मोठ्या प्रमाणात गोल्डन कार्ड काढून गरजु नागरिकांना मोफत खाजगी दवाखान्यात आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया याचा लाभ मिळाला आहे .

असंसर्गिक आजार कर्करोग तपासणी जनजागृती मोहीम दिनांक २२/५/२०२५ ते २८/५/२०२५ या कालावधीमध्ये जिल्हातील 23 23 गावात प्रभावी राबविण्यात आला आहे त्यामध्ये आरोग्य शिक्षण चा माध्यमातून जनजागृती व महीलानची तपासणी करण्यात आली .

जागतिक महिला दिनानिमित्त किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी व सिकल सेल तपासणी साठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. डॉ सगिता देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाल मध्ये जिल्हा मध्ये नेरली येथील साथरोग, माळेगाव यात्रा, पिंपळगाव येथील महायज्ञ सप्ताह, बावरी नगर दाभड येथील जागतिक धम्म परिषद, या ठिकाणी विशेष नियोजन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी याच्या मार्गदर्शन खाली येणाऱ्या सर्व भाविकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून यशस्वी केली आहे. डॉ सगिता देशमुख यांनी एक वर्ष मध्ये आरोग्य विषयक उपक्रम राबविले बदल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन चा त्याच्या वर वर्षीव होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button