नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचा सिडको येथील कै.शंकरराव चव्हाण अभ्यासिकेचा विध्यार्थी गजानन धनेगावकर हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पास होऊन अभियंता श्रेणी वर्ग 1चा अधिकारी पदी नियुक्ती झाल्या बद्दल शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख तथा उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी बळीरामपुर येथील निवासस्थानी जाऊन आईवडील,आजोबा यांच्या उपस्थितीत सत्कार करून शुभेच्छा दिल्या,व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बसणाऱ्या विध्यार्थी यांनी अभ्यासिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.


महानगरपालिकेचे सिडको येथील कै.शंकरराव चव्हाण वाचनालंय, अभ्यासिकेचा विद्यार्थी गजानन
धनेगावकर यांची महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षामध्ये (Mpsc) उत्तीर्ण होऊन, श्रेणी वर्ग 1चा अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या गावी बळीरामपूर येथे जाऊन त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. निवड झाल्यावर या यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे आजोबा, आई/वडील, तसेच सिडकोतील मनपाच्या अभ्यासिकेला, वाचनाल याला दिले आहे.


विनय पाटील गिरडे यांनी यावेळी माझ्या पुढाकारातून सिडको /हडको तसेच परिसरातील विद्यार्थ्यांसाठी. नांदेड मधील महानगरपालीकेचे सर्वात मोठे,अद्यावत असे वाचनालंय व अभ्यासिका झाले आहे.


ज्यामध्ये फर्निचर सह मुला/मुलींसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आहे. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे सर्व पुस्तकं येथे उपलब्ध असतात. मनपाचे चांगले कर्मचारी येथे काम करतात. या वाचनालायचे बरेच विद्यार्थी शासकीय सेवेत विविध विभागात नोकरीला लागले आहेत. मी केलेल्या एखाद्या कामाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.आणि मला सुद्धा माझ्या हस्ते एक चांगले काम झाल्याचा आनंद वाटत आहे.

परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी या अभ्यासिकेचा फायदा घ्यावा असे आवाहनही केले आहे. यावेळी ऊपसरपंच नागेश वाघमारे,रवि थोरात, माजी सरपंच विश्वाभंर फुले, पोलीस पाटील बुध्देवार, ग्रामपंचायत सदस्य जकीर शेख ,चिते, बाबुराव गजभारे यांच्या उपस्थिती होती.


