
हिमायतनगर| सरपंच पदाच्या २५ एप्रिल आरक्षणात सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेल्या आदर्श गाव टेंभी, दुय्यम बाजार पेठ असलेल्या कामारी, सिरंजनी, आंदेगाव, पोटा खु या पाच गावातील सरपंचपद ईतर मागासवर्गीसाठी आरक्षित झाले आहे. या गावांचा अपवाद वगळता उर्वरित गावांचे आरक्षण बहुदा जैसे थे अवस्थेत आहे.


हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात दिनांक १ जुलै रोजी दुपारी 3 वाजता ऊपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार पल्लवी टेमकर, पेशकार चंद्रुभैया राठोड यांच्या उपस्थितीत प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायत निहाय आरक्षणाची चिठ्ठी बालकांच्या हस्ते काढून सरपंच पदाची सोडत जाहिर करण्यात आली. यात तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती पैकी २७ जागा महिलासाठी तर २५ जागा पुरुषासाठी सुटल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी ७ पैकी ४ महिला, ३ पुरुष, अनुसूचित जमाती १० पैकी ५ महिला ५ पुरुष, ओबीसी १४ पैकी ७ महिला, ७ पुरुष, ओपन २१ पैकी १० पुरुष ११ ठिकाणी महिला असे आरक्षण सुटले आहे.

ग्रामपंचायत निहाय आरक्षणात अनुसूचित जाती महिलासाठीची – वारगटाकळी, दाबदरी, एकंबा,, सिबदरा ज., अनुसूचित जाती पुरुष – करंजी, घारापूर, पोटा बु. अनूसूचित जमाती महिला – टेंभूर्णी, धानोरा ज, खडकी बाजार, डोल्हारी , सोनारी, अनुसूचित जमाती पुरुष – सीरपल्ली, बोरगडी, जवळगाव, विरसणी, खैरगाव ज. ओबीसी महिला – कामारी, पारवा बु, टाकराळा बु., पार्डी ज, चिंर्चोडी, सिरंजणी, दरेगाव, ओबीसी पुरुष – सरसम बु., महादापुर, बोरगाव ता., खैरगाव ता., आंदेगाव, टेंभी, पोटा खू. सर्वसाधारण महिला – सवना ज, वाघी, एकघरी, जिरोना, दुधड, वडगाव ज, पळसपूर, दरेसरसम, काडंली खु., कौठा ज., कार्ला पी., सर्वसाधारण पुरुष – वाई, वाशी, कामारवाडी, मंगरुळ, वटफळी, कांडली, बु, दिघी, बळिराम तांडा, पारवा खु, पवना, दिघी असे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.





