नांदेड| नांदेड येथील प्रियदर्शनी ग्लोबल इंग्लिश स्कूलचे संचालक हे 2019 मधील कोविड काळातील फिस व त्यावरील व्याज लावून 17 ते 18 हजार रूपये भरा अन्यथा दहावी पासची टी.सी. देणार नाही, असे सांगून विद्यार्थ्यांची लूट करीत आहेत. ही लूट थांबवून न्याय देण्याची मागणी शिक्षणमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नामदेव पांचाळ यांनी केली आहे.


प्रियदर्शनी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये कु. नेहा नामदेव पांचाळ ही विद्यार्थिनी पहिले दहावीपर्यंत शिक्षण घेत होती. कु. नेहा पांचाळ ही दहावी परीक्षेत पास झाल्यानंतर टी.सी. काढण्यासाठी शाळेत गेली असता शाळेचे संचालक हे 2019 मधील कोविड काळातील फिस व त्यावरील व्याज लावून 17 ते 18 हजार रूपये भरण्यास सांगत आहेत. त्यामुळे गरीब विद्यार्थिनीची कुचंबना होत आहे. शासनाने कोविड काळातील फिस माफ केलेली असताना सदरील शाळेचे संचालक विद्यार्थ्यांची लूट करत आहेत. ही लूट थांबवावी, अशी मागणी शिक्षणमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नामदेव पांचाळ यांनी केली आहे.




