हिमायतनगर l हिमायतनगर- गोल्ला -गोलेवार यादव महासंघाची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले,या बैठकीत हिमायतनगर गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे शहर अध्यक्ष म्हणून श्री श्यामजी जक्कलवाड यांची निवड समाजातील जेष्ठ समाजसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये निवड करण्यात आली आहे.


श्याम जक्कलवाड यांनी समाजातील सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग असतो. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेने सामाजिक कार्य करत असतात, गोल्ला गोलेवार यादव समाजाचे हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष म्हणुन जबाबदारी सांभाळत उत्कृष्ट कामगिरी केली बजावली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडले असताना आदरणीय सुभाषरावजी शिल्लेवाड यांच्या सुचनेनुसार श्याम जक्कलवाड यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

यावेळी राष्ट्रसंत द.भ.प.श्री. साईनाथ महाराज वसमतकर, बितनाळकर बरबडेकर, गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड भोसीकर, समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री पी. जी. रुद्रवाड सर, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष श्री रमेशजी रामपूरवार, सचिव श्री अशोकराव कासराळीकर, कोशाध्यक्ष श्री तुकारामजी कैलवाड, कर्मचारी प्रांताध्यक्ष श्री अनुपजी अन्नमवार, कर्मचारी प्रांत सचिव श्री संदेशजी कमठे, नांदेड जिल्हा कर्मचारी कोशाध्यक्ष श्री माधवराव वटपलवाड सर, नवनिर्वाचीत गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे युवक प्रदेश अध्यक्ष श्री अभिषेकजी बक्केवाड, समाजाचे मार्गदर्शक श्री बालाजीराव शेनेवाड, श्री परशुरामजी अक्कमवाड, श्री साईनाथजी अन्नमवाड, श्री साईनाथजी निम्मेवाड, श्री मधूकरजी मुरगुलवाड,राजु पोटेवाड, व इतर समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.


हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सर्व राजकीय पुढारी व समाज बांधव तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा देत आहे.


