हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव येथे ऐतिहासिक तलाव असून, त्यालगत असलेली टेकडी शहर वासीयांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहू शकते. पण या बाबतीत लोकप्रतिनिधींच कमालीचे दुर्लक्ष आणि आता पर्यतच्या नगराध्यक्षाचे दुर्लक्ष याकडे राहीले आहे. नगरपालिकेच्या प्रांगणात असलेल्या बागेत मोठ्या अक्षरांत लिहिलेलं ‘आय लव्ह माय हदगाव’ हे चिन्ह परिसराची शोभा वाढवत असलं, तरी आज त्या
भोवतालची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे.


बागेतील झाडे कोमेजली आहेत, हिरवळ सुकली आहे आणि एकेकाळी आधुनिक ओळखीचे प्रतीक असलेलं हे चिन्ह प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे फिकट पडले आहे. मानसूनमध्ये जलसंचय, आता कोरड्या झुडपांची गर्दी…. मानसूनच्या काळात सर्व सामन्याचा वॉर्डांमध्ये होणारे जलसंचय ही सामान्य बाब झाली आहे. पण सध्या बहतांश प्रभागात अनियंत्रित झुडपांनी कब्जा केला आहे. बगीच्याच्या सौंदर्यावर हे दुर्लक्षपणा आणि स्वच्छतेच्या अभावामुळे संपूर्ण परिसर उपेक्षित जंगलासारखा दिसत आहे.


“आय लव्ह माय हदगाव’ चिन्हपूर्वी शहराच्या आधुनिक ओळखीचं प्रतीक मानलं जाणारं ‘आय लव्ह माय हदगाव’ हे चिन्ह सध्या दुर्लक्षित स्थितीत आहे. त्या भोवतालची हिरवळ सुकलेली आहे, झाडे मुरजलेली आहेत. या स्थितीमुळे हदगावची प्रतिष्ठा धोक्यात आली असून, स्थानिक नागरिक यामुळे प्रचंड नाराज आहेत. आज या ठिकाणी कोणी यावं की नाही, याचा विचार करावा लागतो आहे.


स्वच्छता, सौंदर्य आणि सुरक्षिततेचा येथे अभाव स्पष्ट जाणवतो आहे. मुख्य रस्त्यालगत नाल्यांत गाळ व कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला असलेल्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, प्लास्टिकचा कचरा व घाण साचलेली आहे. थोड्याशा पाण्यात काढलेली शेवाळ, दुर्गंधी आणि अस्वच्छता यामुळे संपूर्ण परिसराचे प्रदूषण वाढले आहे. शिवाय सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली असून, मान्सून पूर्व साफ सफाई करावी अशी नागरिक मागणी करत आहेत.

प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे…!
हदगाव शहरा प्रती प्रेम बाळगणारे नागरिक या दुर्दशेने व्यथित झाले आहेत. त्यांना आशा आहे की, प्रशासन तातडीने यावर पावले उचलावी आणि शहराची स्वच्छता व सौंदर्य पुन्हा पूर्ववत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.


