Homeनांदेडfinally got new buses : उशीरा का..? होईना हदगांव एस टी आगाराला...

finally got new buses : उशीरा का..? होईना हदगांव एस टी आगाराला अखेर नवीन बसेस मिळाल्या

हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव एस टी आगारामध्ये पहिल्या टप्यातील सहा नवीन बसचे लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. या बाबतीत अनेक माध्यामातून आवाज उठविण्यात आला होता. विशेष म्हणजे नांदेड न्युज लाईव्ह ने या बाबत सर्वात प्रथम पाठपुरावा केला होता. आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते नवीन बसचे पूजन करून जनतेच्या सेवेसाठी रवाना करण्यात आल्या आहेत.

हदगाव एस टी आगारामध्ये अनेक दिवसांपासून अपुऱ्या बस तसेच नादुरुस्त बसमुळे लोकांना बस स्थानकामध्ये अनेक तास ताटकळत बसावे लागत असे. हदगाव व हिमायतनगर या दोन्ही तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिक दिव्यांग वयोवृद्ध यांना बस प्रवासामध्ये दिलेल्या सूटमुळे बस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली त्यामुळे अपुऱ्या बसमुळे प्रवाशांची खूप मोठी गैरसोय होत होती.

या सर्व बाबींचा विचार करून हदगांव हिमायतनगरचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या सहकार्याने हदगाव आगाराकरिता नवीन बसची मागणी केली होती. त्यातील आज पहिल्या टप्प्यातील सहा बस आपल्या हदगाव आगारांमध्ये दाखल झाल्या. विद्यमान आमदारांच्या हस्ते या नवीन बसचे आज पूजन करून लोकार्पण करण्यात आले. या बसमुळे नक्कीच प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवाशांनी या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे स्थानिय माध्यामांनी हा प्रश्न उचलून धराला होता, त्यामुळे उशीरा का..? होईना हदगाव आगाराला नवीन बसेस मिळाल्या आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments