नांदेडलेख

Sp Abinash kumar ; मिशन उडान : नांदेडच्या राजकारणाला धडा शिकविणारे एसपी अबीनाश कुमार

१७३ लाख कोटी रुपये कर्ज असलेल्या भारत देशात महागाईने उचांग गाठला आणि बरोजगारांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांना नांदेड येथील पोलीस अधीक्षक असलेल्या श्रीमान अबीनाश कुमार यांनी नवा इतिहास घडवीला आणि राजकारण्यांना एक प्रकारे धडाच शिकवीला.

२०१८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अबीनाश कुमार यांच्या इच्छाशक्तीची राज्यभर चर्चा होताना दिसते. त्यांनी नांदेड मध्ये जनहितवादी अनेक वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गुन्हेगारी, अवैध धंदे आणि दादागिरी या त्रिसूत्री कार्यक्रमाचा नायनाट करण्याचा त्यांचा उद्देश पूर्ण होताना दिसतो आहे.

नांदेडच्या गल्लीबोळातून गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला हद्दपार करणारे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी ‘मिशन उडान’ च्याअगोदर ‘मिशन फ्लॅश आऊट’ च्या माध्यमातून भल्याभल्याना धूळ चारली. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आणि सामान्य जनतेला न्यायाची आशा निर्माण झाली.गुन्हेगारी व भ्रष्टाचाराला आळा घालून त्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा नेहमीच कसोशिने प्रयत्न केला.

वाळूघाटावर स्वतः प्रत्यक्षात जाऊन कार्यवाही करणे, एखाद्या अधिकारी कर्मचारी यांच्या बाबत पुराव्याणीशी तक्रार आल्यास तडकाफडकी कार्यवाही किंवा बदली करणे,तक्रारदारांचे समाधान करून प्रकरण निकाली काढणे आदिंसाठी ते सुप्रसिद्ध आहेत. जिल्ह्यात सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी त्यांनी विविध पक्ष – संघटनेच्या पुढाऱ्यांना विश्वासात घेऊन शांतता टिकवून ठेवली हे विशेष.

घेतलेला निर्णय आणि केलेली घोषणा पूर्णत्वास नेणारे व्यक्तीमत्व

नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रेमाने व विश्वासाने काम करून घेण्याची आदरणीय एसपी साहेबांची कार्यपद्धत सर्वांनाच आवडणारी आहे. ३ मे २०२५ रोजी त्यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कवायत मैदान येथे ‘मिशन उडान’ या लक्षवेधी अभियाना अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने भव्य बेरोजगार मेळावा घेतला.या मेळाव्यात साधारणतः ११ हजार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल असे नियोजन केले.वेगवेगळ्या नामांकित कंपण्यांना आमंत्रित केले आणि पहिल्या सत्रात ३ हजार ५०० बेरोजगारांना नोकरी मिळाल्याचे नियुक्ती पत्र दिले. नोकरीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूपच आशादायी होता.

खरे पाहिले तर असे उपक्रम राबविण्याची जबाबदारी ही राजकीय किंवा सत्ताधारी मंडळीची असते किंबहुना सरकारची असते परंतु राजकारण्यांच्या नाकावर टिचून एसपी अबीनाश कुमार यांनी नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक आदरणीय शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन उडान अभियान यशस्वी करून चमकोगिरी करणाऱ्या तथाकथित स्थानिक राजकारण्यांना डाऊन केले आहे.खऱ्या अर्थाने हा नांदेड पॅटर्न देशभर राबविण्याची गरज आहे.

दुष्टांचा सर्वनाश,युवकांना यशस्वी आणि गुन्हेगारांचा पर्दाफाश करणाऱ्या श्रीमान अबीनाश कुमार यांना क्रांतिकारी सलाम! आणि पुढील कार्यास मनःपूर्वक सदिच्छा !!

लेखक-कॉ.गंगाधर गायकवाड,नांदेड. मो. 7709217188, दि. ४ मे २०२५

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button