नांदेड| मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त, (भारतीय महसूल सेवा.) अंकेत जाधव यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असेल तर यूपीएससी परीक्षेचे शिखर सहज पार करता येते असे सांगितले.


त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणतीही गोष्ट अवघड नसते ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी सकारात्मक पद्धतीने अभ्यास करावा तसेच या मार्गदर्शनात त्यांनी त्यांच्या यशाची यशोगाथा विद्यार्थ्यांना सांगितली व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा याविषयी आपले मत मांडले.


याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि करिअरच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते असे त्यांनी सांगितले. या व्याख्यानाचे आयोजक अर्थशास्त्र विभाग प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ. दत्ता मगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रा. सुजित कमलाकर यांनी आभार मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.




