HomeनांदेडThree-day folk arts festival ; नांदेडमध्ये सांस्कृतिक विभागाच्या तीन दिवसीय लोककलांचा महोत्सव 

Three-day folk arts festival ; नांदेडमध्ये सांस्कृतिक विभागाच्या तीन दिवसीय लोककलांचा महोत्सव 

नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित “असंघटित लोककलांचा महोत्सव” १७ मार्चपासून सुरू झाला आहे. शहरातील कुसुम सभागृहात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ केला .१९ मार्चपर्यंत संध्याकाळी ६ ते १० वाजेपर्यंत रंगणार आहे. कला संस्कृती यामध्ये रस असणाऱ्या श्रोत्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

या महोत्सवात गोंधळ, बहुरूपी, लावणी, गोंधळी गीते, आदिवासी नृत्य, पोवाडे, वाघ्या-मुरळी, दशावतार आदी विविध लोककला सादर केल्या जाणार आहेत. प्रवेश विनामूल्य असल्याने रसिकांना हा सांस्कृतिक सोहळा मोफत अनुभवता येणार आहे.

IMG 20250318 WA0013 Three-day folk arts festival ; नांदेडमध्ये सांस्कृतिक विभागाच्या तीन दिवसीय लोककलांचा महोत्सव 

या उपक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले असून, श्रीकृष्ण कला फाउंडेशन महोत्सव समन्वयक आहे. 17 मार्चला पहिल्या दिवशी विविध लोककलांनी या कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या लोककलांचे सादरीकरण आणि त्याबाबतची माहिती देखील यावेळी सादर केली जाते.

IMG 20250318 WA0014 Three-day folk arts festival ; नांदेडमध्ये सांस्कृतिक विभागाच्या तीन दिवसीय लोककलांचा महोत्सव 

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी पिंगळा जोशी या लोककलेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पिंगळा जोशी, हेळवी, बहुरूपी, धनगर ओवी, कडकलक्ष्मी, करपलवी गोंधळी आदी लोककलेचे सादरीकरण झाले.पिंगळा या लोककलेबाबत प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज कौर यांनी माहिती दिली. दररोज सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल नांदेडकर कलारसीकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

IMG 20250318 WA0012 Three-day folk arts festival ; नांदेडमध्ये सांस्कृतिक विभागाच्या तीन दिवसीय लोककलांचा महोत्सव 

उदया १८ मार्च: आदिवासी गोंधळ गीत, आदिवासी गोंधळ नृत्य, आदिवासी पाटा गायन, मथुरा लभान नृत्य सादर केले जाणार आहे.

हा महोत्सव पारंपरिक लोककला आणि कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी रसिकांनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमाला समन्वयक कृष्णात कदम हे उपस्थित होते तर व्यासपीठावर डॉक्टर संजय पुरी उमेश जोगी श्यामजी मडगे भास्कर डोईबळे यांचे सत्कार करण्यात आले. उद्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments