नांदेड l पंचविस फेब्रुवारीला उ.म.प्रा.विगाग फेस्काॅम नांदेडच्या वतिने महाराष्ट्र शासनास अर्थात मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, मा.ना.उपमुख्यमंत्री द्वयांना, मा. ना.संजयजी शिर्साट साहेब मंत्री सामाजिक न्याय यांना,मा.प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग यांना सविस्तर निवेदन मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत पाठऊन विंनंती केलेली होती की सरसकट नको, पण खरे गरिब, गरजवंत,दुर्लक्षित,उपेक्षित,वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार,विधवा माता, निराधार, दिव्यांग अदि ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या बाकी चालू असलेल्या कुठल्याही योजनांचा कसलाच फायदा मिळत नाही.


म्हणून त्या बंद करून,त्यांना एकमात्र “मुख्यमंत्री लाडके ज्येष्ठ मायबाप योजना” व “सन्मान धन” तथा “मानधन” चालू करा व इतर प्रलंबित मागण्या विषयी माहिती दिलेली होती.पुन्हाही पाठपुरावा केलेला होता.नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊही आमदारांना हे निवेदन दिलेले आहे.स्वतः मी, सचिव कुंटूरकर, माधवराव पवार काटकळंबेकरनी मुंबईत मा.ना.मुख्यमंत्रीजींना आ.बोंढारकर यांच्यासोबत निवेदन देऊन प्रत्यक्ष अल्पसी चर्चा करून आलो.मा.मुख्य मंत्रीजीनी निवेदन त्यांच्या खाजगी सचिवाना दिले.

तरी पण आज पर्यंत तरी ज्येष्ठांबद्धल अधिवेशनात कुठेच कसलीच चर्चा घडून आलेली दिसली नाही किंवा कसलीच अर्थिक तरतूद केलेली दिसत नाही . कालच्या सादर केलेल्या अर्थ संकल्पात व अधिवेशनात गरजवंत ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यास कसलीच किंमत दिली गेली नाही! जनू कांही सर्व मा. आमदार, खासदार, तथा मंडळा तील मंत्री व सचिव मंडळी आकाशातून पडलेली आहेत की काय? त्यांना आई-वडिलांनी जन्मच दिलेला नाही की काय?तथा ज्येष्ठ नागरिकांच्या मतांची त्यांना आता पुन्हा कधिच गरजच पडणार नाही की काय?ते आमरण अन्न पाणी त्याग करून तथा उष्माघाताने मेले तरी चालतील अशीच त्यांची ईच्छा असल्याचेच यावरून स्पष्ट दिसून आले आहे!!

शासनास या गरिब,गरजवंत ज्येष्ठ नागरिकांना आमरण अन्न पाणी त्याग तथा संभाव्य “उष्माघात” मृत्यूच्या धोक्यापासून परावृत्त करावयाचे असल्यास अजूनही आमच्याशी सुसंवाद साधता येऊ शकेल.संधी आहे!

दुसरा कसलाच पर्याय न उरल्यास व ज्येष्ठांना घरात रोज थोडे थोडे मरत रहाण्या पेक्षा येत्या “राष्ट्रीय शहिद दिनी”, रविवारी सकाळी ठिक नऊ वाजता शहिद “भगत सिंघ,राजगुरू व सुखदेव सिंघ” यांच्या प्रतिमेस पुष्प माला अर्पण करून वजिराबाद चौक येथून पंधरा ते विस हजार ज्येष्ठ नागरिक “लक्ष वेधी महा पदयात्रेस” सुरूवात करतील असे आता निश्चित ठरले आहे. ज्येष्ठांची ही महा पदयात्रा छ.शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून अत्यंत शांततेने, कशाल्याही घोषणा न देता रस्त्याच्या डाव्या बाजूनी महात्मा गांधीजींचा पुतळा ते मा.जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत येईल.
*मा.जिल्हाधीकारी साहेबांना निवेदन देऊन आल्या नंतर पदयात्रेस मार्गदर्शन करण्यात येईल.”शासनाचे लक्ष वेधन्या साठी” आमरण अन्न पाणी त्याग सुरू करतील.नांदेड मधिल सत्तेतील व सत्ता बाहय लोक प्रतिनिधी,सामाजिक संस्थांना तथा ज्येष्ठ नागरिक प्रेमी सुहृदयी व्यक्तींना आहावान करण्या येत की आपणही ज्येष्ठांच्या या न्याय चळवळीत सहभाग नोंदऊन सर्व सामान्य “लोकहित चळवळीत” तथा “जनहित चळवळीत” सहभाग घ्यावा असे डाॅ.हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटूरकर,गिरिष बार्हाळे, माधवराव पवार,डाॅ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार अदिनीं केलेले आहे.*