श्रीक्षेञ माहूर,कार्तिक बेहरे| भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात बुथस्तरीय समित्या गठीत करण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने किनवट-माहुर मतदारसंघांचे आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष श्रीकांत घोडेकर यांच्या नेतृत्वात माहुर शहरासह तालुक्यात बुथस्तरीय समित्या स्थापन करण्यात येत आहे.


दि.११ मार्च २०२५ रोजी जेष्ठ पत्रकार तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले यांनी माहुर शहरातील बुथ क्रमांक ३० व ३१ मध्ये बुथ समित्या गठीत करीत बुथ क्र. ३० च्या बुथ प्रमुख पदी जुने जाणते कार्यकर्ते गोपाल वामनबुवा आराध्ये तर बुथ क्र.३१ च्या बुथप्रमुख पदी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सुजाता सुदर्शन जोगदंडे याची निवड करण्यात आली. यावेळी विजय आमले यांनी दोन्ही बुथ प्रमुखांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
