हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढोणा वारणावती येथील प्रसिद्ध, अद्वितीय देवता देवाधिदेव हरिहर, महादेवाचा अवतारात असलेल्या श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने लाखो भाविकांनी दर्शन घेतले असून, रात्री 1 वाजता शिवापती मंदिरातील शिव – पावर्तीचा अभीषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर मध्यरात्री मंदिर संस्थानचे पदसीध्द अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोषात श्रीची शासकीय पूजा व अभीषेक अलंकार सोहळा संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी शेकडो भाविक भक्तांनी भगवा ध्वज अर्पण करून अलंकारमय श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पारण्याचा उपवास सोडला आहे.



मागील वर्षांपासून माहूर येथील वतनदारांची महापूजा व अभिषेक सोहळ्यानंतर मध्यरात्री उशीरा श्रीच्या मुर्तीला सोने, चांदीचा अलंकार, टोप, चंद्रहार, दोन, तीन व पाच पदरी हार, कर्णकुंडल, कंबरपट्टा, नेकलेस, बाजूबंद, पैंजण, कडे, ब्रॅसलेट आदींसह अन्य आभुषने सुवर्णकार बाबुराव सकवान यांच्या हस्ते चढविण्यात आले. यावेळी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार हिमायतनगर, उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, प्रकाश कोमावार, सौ. लताबाई मुलंगे, सौ. लताबाई पाध्ये, प्रकाश शिंदे, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड.दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपीक बाबुरावजी भोयर, तसेच सेवा सहकारी सोसायटीचे चेयरमन प्रवीण शिंदे, संतोष गाजेवार, सावन डाके, रामभाऊ सूर्यवंशी, पोलीस बांधव, विविध समित्यांचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थीत होते.



दरम्यान अलंकारमय श्री परमेश्वर मूर्तीच दर्शन भाविकांना दहीहंडी काल्यापर्यंत घेता येणार असून, मुर्तीचं सगुण रूप पाहुन भावीक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटणार आहेत. मुर्तीच्या संरक्षणासाठी बंदुकधारी पोलीस तैनात करण्यात आले असून, शिवरात्रीच्या दुस-या दिवशी परंपरेनुसार शहरातील भक्तगण व मानकरी भक्तंाकडुन बँड – बाज्याच्या गजरात मिरवणुक काढुन भगवे झंडे उभारून पुजा- अचर्ना करण्यात आली. तसेच श्री परमेश्वरच्या चरणी दाळ -भात, पुरण-पोळी व गुळाचे नैवेद्य दाखऊन पारण्याचा उपवास सोडण्यात आला. हा अदभुत व भक्तीमय सोहळयाचा संगम पाहण्यासाठी तालुक्यासह विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, आंध्रप्रदेशासह राज्यातील कानाकोप-यातुन भावीक भक्तांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली होती. दरम्यान मंदिर दशर्नसाठी आलेले भावीक व अंलकारमय श्री मुर्तीच्या संरक्षणासाठी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी मंदिर परीसरात बंदुकधारी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावला होता.



