Lord Shri Parameshwara : महाशिवरात्रीच्या मध्यरात्री वाढोण्याचे आराध्य दैवत श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा थाटात संपन्न
हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढोणा वारणावती येथील प्रसिद्ध, अद्वितीय देवता देवाधिदेव हरिहर, महादेवाचा अवतारात असलेल्या श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने लाखो भाविकांनी दर्शन घेतले असून, रात्री 1 वाजता शिवापती मंदिरातील शिव - पावर्तीचा अभीषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर मध्यरात्री मंदिर संस्थानचे पदसीध्द अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोषात श्रीची शासकीय पूजा व अभीषेक अलंकार सोहळा संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी शेकडो भाविक भक्तांनी भगवा ध्वज अर्पण करून अलंकारमय श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पारण्याचा उपवास सोडला आहे.
मागील वर्षांपासून माहूर येथील वतनदारांची महापूजा व अभिषेक सोहळ्यानंतर मध्यरात्री उशीरा श्रीच्या मुर्तीला सोने, चांदीचा अलंकार, टोप, चंद्रहार, दोन, तीन व पाच पदरी हार, कर्...
