नांदेड| भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य अधिवेशन सेलू जिल्हा परभणी येथे दि. २७ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी पर्यंत भरत आहे. या राज्य अधिवेशनास प्रमुख मार्गदर्शक म्हणून माकपचे समन्वयक तथा प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस कॉ. प्रकाश कारत आणि पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. डॉ. अशोक ढवळे यांची उपस्थिती असणार आहे.


त्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभर २५ फेब्रुवारी रोजी रेड फ्लॅग डे साजरा करण्याचे आवाहन माकप च्या वतीने करण्यात आले होते. महात्मा फुले पुतळा येथे दुपारी दोन वाजता नांदेड तालुका कमिटीच्या हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राज्य अधिवेशन चिरावू होवो. मार्कस्वाद – लेणीनवाद जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. माकप राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. विजय गाभणे यांनी राज्य अधिवेशनाच्या अनुषंगाने काही सूचना दिल्या तसेच त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी माकप तालुका सचिव कॉ. गंगाधर गायकवाड, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ उज्वला पडलवार, तालुका कमिटी सभासद कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ. मीना आरसे, कॉ. जयराज गायकवाड, डॉ. आदिनाथ इंगोले,कॉ.पवन जगदमवार यांचे सह कॉ.सुभाषचंद्र गजभारे,कॉ. शेख लतीफ, कॉ. गंगाधर खुणे आदींची उपस्थिती होती. अशी माहिती माकप तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.
