नांदेड| मिसींग मधील इसमाचा खुन करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन नांदेड ग्रामीण पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे.


याबाबत सविस्तर असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड. यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत गुन्हे निर्गतीचे आदेश सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंलोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. नांदेड ग्रामीण मिसींग क्र. 17/2025 मध्ये तपासाचे चक्र फिरवुन हरवलेला इसम दत्ता हनमंत कोल्हे वय 28 वर्ष रा. भायेगाव ता.जि. नांदेड यांचा शोध घेत असतांना चार इसमांना संशयावरुन ताब्यात घेतले होते.

त्यापैकी 1) विश्वनाथ गोपीनाथ कोल्हे 2) गणेश संजय कोल्हे रा. भायेगाव ता.जि. नांदेड यांना ताब्यात घेवुन संशयीत इसमांना विश्वासात घेवुन कौशल्यपूर्ण तपास केला असता मयत दत्ता हनमंत कोल्हे याचा धारदार शस्त्राने खुन करुन, त्यांचे प्रेत तुप्पा शिवारातील लोहेकर खरवंडकर यांचे शेतातील खदानीत नायलॉनच्या पोत्यात टाकुण सिमेन्ट पोलला ताराने बांधुन त्याचे मोटार सायकलसह खदानीच्या पाण्यात टाकले. आरोपीतांनी गुन्हा केल्याचे कबुल केले व खंदानीचे पाण्यात टाकलेले दत्ता हनमंत कोल्हे यांचे प्रेत दाखविले. त्यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे गु.र.नं. 139/2025 कलम 103(1), 238, 3(5) भारतीय न्याय संहीता-2023 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगीरी करणाऱ्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे. नमुद गुन्हयांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुरेश मान्टे हे करीत आहेत.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशील कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, इतवारा, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रामीण, सुरेश मान्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण, बाबुराव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण, ज्ञानेश्वर मटवाड, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण पोलीस अमंलदार :- पोहेकों. व्यवहारे, पोहेको. गटलेवार, पाहेको. मोरे, पोना. डफडे, पोकॉ/389 पवार, पोकों. कल्याणकर, पोकॉ. जमीर यांनी केली आहे.
