नांदेड,अनिल मादसवार| जिल्हयामध्ये वाळु माफीयाकडुन अवैध्य मार्गाने वाळु उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असल्याने वाळु उपसा होत असलेल्या घाटावर खुद्द पोलीस अधीक्षक आपल्या ताफ्यासह पोचले. आणि वाळु उपसा करणारे १६ इंजिन किंमती ६४ लक्ष रुपये, ६० तराफे किंमती २१ लक्ष रुपये, एक जेसीबी किंमती ५० लक्ष, २०० ब्रास काळी वाळु किंमती १० लक्ष रुपये, ०६ मोठ्या बोट किंमती ६० लक्ष रुपये, ०३ छोटया बोट किंमती ९ लक्ष व एक रेतीसह हायवा किंमती २५ लक्ष २० हजार रुपये असा एकुण २ कोटी ३९ लक्ष २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या धडाकेबाज कार्यवाहीमुळे नांदेड जिल्ह्यातील वाळू माफियाट खळबळ उडाली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफीयाकडुन अवैध्य मार्गाने वाळु उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असल्याने अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी जिल्हयातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना अवैध्य वाळु उपसा व वाहतुक संदर्भाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक ०५/०२/२०२५ रोजी सकाळच्या प्रहरी ०४.३० वाजताचे सुमारास अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय स्था.गु.शा, डी. बी. पथके, विविध पो. स्टेचे वर नमुद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळी पथके तयार करुन अवैध्य वाळू उपसा घाटावर कारवाई करणेकरीता रवाना केले.



सदर पथकाने पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, सोनखेड व लिंबगाव हद्यीमधील राहटी, भणगी, पेनुर, बेटसांगवी, थुगाव, वाहेगाव, गंगाबेट व कल्लाळ शिवारातील गोदावरी नदी पात्रातुन अवैध्य वाळु उपसा करणारे ठिकाणांवर छापा कार्यवाही करुन सदर ठिकाणाहुन १६ इंजिन किंमती ६४,००,०००/-रुपये, ६० तराफे किंमती २१,००,०००/- रुपये, एक जेसीबी किंमती ५०,००,०००/-रुपये, २०० ब्रास काळी वाळु किंमती १०,००,०००/- रुपये ०६ मोठया बोट किंमती ६०,००,०००/- रुपये, ०३ छोटया बोट किंमती ९,००,०००/-किंमतीचा मुद्येमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सदर ठिकाणी महसुलचे अधिकारी व अमंलदार यांना बोलावुन घेण्यात आले असुन पंचनामे करणे सुरु असुन पंचनामे झाल्यानंतर पुढील कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे.



त्याप्रमाणेच पोलीस ठाणे भोकर हद्यीत अवैध्य रेती वाहतुक करणारा हायवा किंमती २५,२०,०००/-रुपयेचा जप्त करण्यात आला असुन नमुद वाहनाचे चालक व मालक यांचेविरुध्द पोलीस ठाणे भोकर येथे गुरनं. ५४/२०२५ कलम ३०३(२), २८१, ३(५) भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही करण्यासाठी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड हे स्वतः हजर राहुन नांदेड जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध्य रेती उपसा व रेती वाहतुक करणाऱ्या इसमांवर कार्यवाही करुन एकुण २,३९,२०,०००/- (दोन कोटी एकोणचाळीस लाख वीस हजार) रुपयाचा मुद्येमाल ताब्यात घेतला असून, वाळु उपसा करणारे इंजिनचे चालक व मालक, जेसीबी चालक व मालक व हायवा चालक व मालक, यांच्यावर कार्यवाही करण्यात आली कलम ५४/२०२५ ३०३ (२), २८१, ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, पो. स्टे. नांदेड ग्रामीण, अजित कुंभार, पोलीस निरीक्षक, पो. स्टे. भोकर, पांडुरंग माने, सहा. पोलीस निरीक्षक, पो. स्टे. सोनखेड श्री चंद्रकांत पवार, सहा पोलीस निरीक्षक, पो. स्टे. उस्माननगर, स्थागुशा, नांदेड येथील पोउपनि. मिलींद सोनकांबळे, आनंद बिचेवार, अशिष बोराटे, माधव केंद्रे यांचे पथके, पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, सोनखेड, उस्माननगर येथील अमंलदार, शिवाजीनगर, वजीराबाद, इतवारा येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमलंदार, RCP व QRT चे प्लाटुन यांनी हि रेती घाटावरील छापा कार्यवाही केली आहे.


