Homeक्राईमTeaching profession is black...! : शिक्षकी पेशाला काळीमा...! मरखेल जि.प.शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा...

Teaching profession is black…! : शिक्षकी पेशाला काळीमा…! मरखेल जि.प.शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

देगलूर, नांदेड| देगलूर तालुक्यातील मरखेल जि.प.शाळेत शिकत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने वाईट नजर ठेवून पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर मेसेज करून लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात त्या… आरोपी शिक्षकावर शनिवार दि. 25 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या निंदनीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे पहिले आदर्श असतात मात्र तालुक्यातील मरखेल जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षक पदावर कार्यरत असलेले सदानंद विद्यासागर भुताळे या शिक्षकांनी हा आदर्श पायदळी तुडवला आहे. त्याच शाळेत इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीस आरोपी शिक्षक हा मागील एक महिन्यापासून लैंगिक उद्देशाने पाठलाग करत होता. एव्हढेच नाहीतर त्याने फिर्यादी पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर मेसेज करून लैंगिक छळ केला आहे.

याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात गु .र .नंबर 22 / 2025 कलम 75 (1), (2) 78 भारतीय न्याय संहिता सह कलम 12 पोस्को अंतरंगात बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक हा अटक असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय वळसे करीत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments