Homeक्राईमlooted the State Bank of India ATM : दरोडेखोरांनी २१ लाख असलेली...

looted the State Bank of India ATM : दरोडेखोरांनी २१ लाख असलेली भारतीय स्टेट बँकेची एटीएम पळविली

किनवट, परमेश्वर पेशवे| भारतीय स्टेट बॅक शाखा गोकुंदाच्या शेजारी असलेले भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडियाची इ.पी.एस. कंपनीचे २१ लक्ष रुपये असलेले ए.टी.एम.मशीन दरोडेखोरांनी (looted the State Bank of India ATM ) पळवुन नेले. हि घटना दि. २२ जानेवारी रात्री १.५८ वाजण्याच्या सुमारास घडली असून किनवट पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडियाचे गोकुंदा शाखा शेजारी असलेले ए.टी.एम हे इलेक्ट्रोनिक पेमेंट सर्व्हीस प्रायवेट लिमिटेड या खाजगी एजंसी कडुन संचलित केले जाते. बुधवार २२ जानेवारीच्या मध्यरात्री १.५८ वाजता चोरट्यांनी मशीन मधील पैशासह दरोडा घातला असुन मुख्य रस्त्यावर व मेन चौकात रात्री बे रात्री वर्दळ असलेल्या भागातुन पैशासह मशीन चोरी गेल्याची खळबळ जनक घटना घडल्याने मोठी नामुष्की पोलिस प्रशासनावर ओढावली आहे.

तरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील तपास अतिरिक्त पोलिस अधिक्षक धरणे, पोलिस निरिक्षक किनवट सुनिल बिर्ला, सहाय्यक पोलिस निरिक्षक सिंदखेड जाधवर, चोपडे, पोलिस उप निरिक्षक झाडे, येवले यांच्यासह पोलिस कर्मचारी तपास करत आहे. अतिरिक्त पोलिस अधिक्षक धरने या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष देत असल्याने या प्रकरणाचा लवकर छडा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

IMG 20250123 135158 looted the State Bank of India ATM : दरोडेखोरांनी २१ लाख असलेली भारतीय स्टेट बँकेची एटीएम पळविली

गोकुंदा येथिल ठाकरे चौक हे क्लासेस व हॉस्टेल या करिता बाहेर गावावरुन आलेल्या विद्यार्थ्यांच्या संचारामुळे व मुलींच्या होणा-या छेडछाडीच्या घटनांमुळे नेहमी चर्चेत राहते त्यात आता या घटणेची भर पडल्याने पोलिसां समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरोड्यामुळे सी.सी.टी.व्ही कॅमेराचा भ्रष्ट्राचार गोकुंदा ग्राम पंचायतचा उघडकीस आला असुन गोकुंदा ग्राम पंचायत ने लावलेले क़ॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्याने झालेल्या दरोड्याच्या घटनेला टिपता आलेले नाही. या प्रकरणी इलेक्ट्रोनिक पेमेंट सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड यांच्याकडुन किनवट पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु होती .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments