Wednesday, May 13

healthcare worker : नोकरीचे ‎‎आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणारा आरोपी आरोग्यसेवक गजाआड

नांदेड| नोकरीचे ‎‎आमिष दाखवून आरोग्य (healthcare worker) सेवकासह अन्य दोघांनी ‎‎किनवट तालुक्यातील एका युवतीवर विदर्भातील जंगलात नेऊन अत्याचार केला असल्याची घटना दिनांक १३ जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी किनवट‎ पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री‎उशिरा गुन्हा दाखल झाला करण्यात आला असून, आरोपीला ‎पोलिसांनी अटक केली आहे.‎

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील २३ वर्षीय बेरोजगार ‎युवतीला एका उपकेंद्रातील आरोग्यसेवक विठ्ठल‎ मुंडे, रा.कंधार याने आशा वर्कर म्हणून‎ गावातच नोकरीस लावून देतो. अशी बतावणी करून तू तुझी कागदपत्रे ‎घेऊन किनवट शहरातील पैनगंगातीरी असलेल्या‎ साईबाबा मंदिराजवळ येऊन मला भेट असे‎ सांगितले होते. त्यावर युवतीने विश्वास ठेवत कागदपत्रे‎ घेऊन सोमवारी दुपारी १ वाजता संशयिताने ‎सांगितलेले ठिकाण गाठले. त्यावेळी मुंडे याने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एक पेशंट पाहण्यासाठी पैनगंगेच्या दुसऱ्या‎ काठावरील विदर्भातील खरबी गावात जायचे‎ आहे. तूसुद्धा सोबत चल म्हणून पीडितेला त्याच्या‎ दुचाकीवर बसवले.

तसेच खरबी गावालगत ‎पैनगंगा अभयारण्याच्या नाक्यासमोरील जंगलात ‎नेले. त्या ठिकाणी संशयिताने युवतीवर अत्याचार‎ केला. त्यानंतर याची चाहूल लागल्याने तिथेच ‎जवळपास असणाऱ्या ३० ते ३५ वर्षीय दोन अज्ञात‎ संशयितांनीही पीडितेवर अत्याचार केला. एव्हढेच नाहीतर तिच्या‎ पर्समधील ३० हजार रुपये. जर कुणाला सांगितली तर मोबाइलमध्ये‎ चित्रित केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुझी बदनामी करण्याची व जिवे मारण्याची ‎धमकी दिल्याची माहिती पीडितेने दिली आहे.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!