नांदेड| बिलोली पोलिसांनी एक काळ्या रंगाची महींद्रा एक्सयुव्ही- 500 कंपणीची चार चाकी वाहन, सहा गोवंश जातीचे जनावरे असा एकुण 4 लक्ष 12 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अन्वये कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 20 रोजी रात्री 02 वाजेच्या सुमारास बिलोली पोलीस हध्दीत पेट्रोलींग करीत असतांना कार्ला फाटा येथे एक काळया रंगाची महिंद्रा कंपणीची चारचाकी गाडी थांबली होती.
वाहनाजवळ जात असतांना सदर गाडी पोलीसांना पाहुण बिलोली शहराकडे निघुन गेली त्यावेळी बिलोली पोलीसांनी तात्काळ सदर गाडीचा पाठलाग करून सदर गाडी थांबवली. त्यात सहा गोवंश जातीची जनावरे किंमती 1,12,000/-रू चे मिळुन आल्याने सदर जनावरे व वाहन असा एकुण किंमती 4 लक्ष 12 हजार रुपयाचा मुद्देमाल आणि आरोपी सैफ पटेल. झिया कुरेशी व इतर साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बिलोली पोलीसांनी चांगली कामगीरी केल्याने वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब नांदेड (IPS), खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड रफिक शेख, उप विभागीय पोलीस अधिकारी, बिलोली यांचे मार्गदर्शनाखाली अतुल भोसले, पोनि, पोस्टे बिलोली पोहेकॉ / मारोती मुददेमवार, सुनिल दस्तके, पोकॉ/ घोंगडे, सर्व ने. पोस्टे बिलोली यांनी केली आहे.