नांदेड| शहरापासून जवळच असलेल्या मौजे तळणी पोस्ट लिंबगाव ता.जि.नांदेड येथील पीडित मातंग समाजातील ७० वर्षीय वयोवृद्ध श्री व्यंकटी भिवाजी डोंपले हे मागील १५ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसून आहेत. ते मुजोर प्रशासना विरुद्ध एकाकी झुंज देत आहेत. त्यांनी दि.३० ऑक्टोबर पासून स्वगृही मौजे तळणी येथे ५ दिवस उपोषण केले आहे. व्यंकटी भिवाजी डोम्पले हे वयोवृद्ध मागील ३० ते ४० वर्षांपासून तळणी येथे जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला घर बांधून रहातात.
त्यांच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व व्यक्ती अशिक्षित आहेत. कुटुंबातील एकूण १० ते १२ जणांचे वास्तव्य तेथे आहे. ते रहात असलेली जमीन ही सरकारी आहे. त्यांच्या घराला चिटकून इतर दोन सवर्णाची घरे आहेत. त्यांना धक्का न लावता डोम्पले यांचे घर ऐन आचार संहितेमध्ये उठविण्याचा कट गावातील सरपंच, ग्रामसेवक, माजी सरपंच,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक व कर्मचारी करीत असल्याचा आरोप डोम्पले यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड, पोलीस अधीक्षक,तहसीलदार आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देऊन दि.२५ ऑक्टोबर रोजी केला होता. परंतु राजकीय दबावाखाली येऊन सदरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप त्यांची दखल घेतली नाही.किंबहुना जातीयवादी अधिकारी – कर्मचारी उपोषणार्थीस भेटण्यास देखील तयार नाहीत.
शासकीय निधीतून मौजे तळणी येथे जिल्हा परिषद शाळेचे वाल कपाउंड (संरक्षक भिंत) बांधकाम सुरु असून व्यंकटी डोम्पले यांचे घर त्या वादग्रस्त कपाउंड मध्ये जाणीवपूर्वक जातीय द्वेष्यातून घेण्यात येत आहे. मागील ३० ते ४० वर्षांपासून तेथे डोंपले कुटुंबातील सर्व सदस्यांचे वास्तव्य असल्यामुळे गावात असलेल्या अमाप जागेपैकी साईज ५० × १०० स्केवेअर फिट जागा गांव नमुना नंबर आठ अ च्या उताऱ्यावर नोंद करावी, त्या जागेवर घरकुल मंजूर करावे आणि नंतर वाल कपाउंडचे काम पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
गावातील सरपंच आणि इतर काही लोक हे येथे कसे रहातात यांना जमवाने जाऊन उठविणार, गरज पडलीच तर जेसीबी लावून नेस्तनाभूत करणार म्हणून राजरोसपणे धमक्या देऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत.एक वेळा जेसीबी चा वापर करून त्यांच्या अंगणातील झाड पाडून टाकण्यात आले आहे. अत्यंत गरीब व मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारे पीडित कुटुंब अडचणीत सापडले आहे. तेव्हा विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूक असल्यामुळे दलित संघटनाचे नेते तळणी कडे फिरकायला तयार नव्हते व ऐन निवडणुकीत आचार संहितेमध्ये आदर्श आचार संहितेचा भंग करीत लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी एका मातंग समाजाचे घर गावातून उठविण्यासाठी आसूसलेले होते.
कायद्याने सर्वच शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहणे कायदा आहे परंतु वरिष्ठाच्या आशीर्वाने एकही कर्मचारी मुख्यालयी तळणी येथे रहात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि एका दलिताचे घर गावातून कायमचे उठविण्यासाठी सर्वच प्रयत्नशील आहेत. पीडितांनी निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महा संचालक, विभागीय महसूल आयुक्त व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे लिंबगाव व सीटू कामगार संघटनेच्या अध्यक्ष, सरचिटणीस आदींना माहितीस्तव दिल्या आहेत. अद्याप कोणत्याही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी व दलित संघटणांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही ही शोकांतिका आहे.
घरी गेल्यास तेथे कधीही हल्ला होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. १५ दिवसापासून एका वयोवृद्ध दलिताचे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु असून अद्याप कसल्याही प्रकारची दखल घेण्यात येत नसल्यामुळे व उपोषणार्थीची तब्येत खालावली असल्यामुळे सीटू च्या वतीने जिल्हाधिकारी व गट विकास अधिकारी नांदेड यांच्या कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
तातडीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारीजि. प. नांदेड ,तहसीलदार आणि गट विकास अधिकारी पं.स.नांदेड यांनी वेळीच हस्तक्षेप करून मार्ग काढावा कारण सदरील प्रकरण हे जातीय द्वेष्यातून घडले असून यास वेगळे वळण लागून अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. कारण उपोषणार्थीची तब्येत दिवसेंदिवस खालवत चालली आहे.म्हणून दि.१९ डिसेंबर रोजी तीव्र निदर्शने करून शासनास स्मरण करून देण्यात येणार आहे.
या निदर्शने मध्ये निष्क्रिय गट विकास अधिकारी पं.स.नांदेड, ग्रामसेवक तळणी, जि.प.प्रा. शाळा तळणीचे मुख्याध्यापक यांची हकालपट्टी करावी व ज्यांनी ज्यांनी पीडित डोंपले यांना जातीय द्वेष्यातून त्रास दिला त्यांच्यावर अनुसूचित जाती – जमाती कायद्याने गुन्हे दाखल करावेत ही मागणी पुढे येत आहे. असे सीटू चे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी लेखी स्वरूपात प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
नांदेड| शहरापासून जवळच असलेल्या मौजे तळणी पोस्ट लिंबगाव ता.जि.नांदेड येथील पीडित मातंग समाजातील ७० वर्षीय वयोवृद्ध श्री व्यंकटी भिवाजी डोंपले हे मागील १५ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसून आहेत. ते मुजोर प्रशासना विरुद्ध एकाकी झुंज देत आहेत. त्यांनी दि.३० ऑक्टोबर पासून स्वगृही मौजे तळणी येथे ५ दिवस उपोषण केले आहे. व्यंकटी भिवाजी डोम्पले हे वयोवृद्ध मागील ३० ते ४० वर्षांपासून तळणी येथे जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला घर बांधून रहातात.
त्यांच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व व्यक्ती अशिक्षित आहेत. कुटुंबातील एकूण १० ते १२ जणांचे वास्तव्य तेथे आहे. ते रहात असलेली जमीन ही सरकारी आहे. त्यांच्या घराला चिटकून इतर दोन सवर्णाची घरे आहेत. त्यांना धक्का न लावता डोम्पले यांचे घर ऐन आचार संहितेमध्ये उठविण्याचा कट गावातील सरपंच, ग्रामसेवक, माजी सरपंच,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक व कर्मचारी करीत असल्याचा आरोप डोम्पले यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड, पोलीस अधीक्षक,तहसीलदार आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देऊन दि.२५ ऑक्टोबर रोजी केला होता. परंतु राजकीय दबावाखाली येऊन सदरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप त्यांची दखल घेतली नाही.किंबहुना जातीयवादी अधिकारी – कर्मचारी उपोषणार्थीस भेटण्यास देखील तयार नाहीत.
शासकीय निधीतून मौजे तळणी येथे जिल्हा परिषद शाळेचे वाल कपाउंड (संरक्षक भिंत) बांधकाम सुरु असून व्यंकटी डोम्पले यांचे घर त्या वादग्रस्त कपाउंड मध्ये जाणीवपूर्वक जातीय द्वेष्यातून घेण्यात येत आहे. मागील ३० ते ४० वर्षांपासून तेथे डोंपले कुटुंबातील सर्व सदस्यांचे वास्तव्य असल्यामुळे गावात असलेल्या अमाप जागेपैकी साईज ५० × १०० स्केवेअर फिट जागा गांव नमुना नंबर आठ अ च्या उताऱ्यावर नोंद करावी, त्या जागेवर घरकुल मंजूर करावे आणि नंतर वाल कपाउंडचे काम पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
गावातील सरपंच आणि इतर काही लोक हे येथे कसे रहातात यांना जमवाने जाऊन उठविणार, गरज पडलीच तर जेसीबी लावून नेस्तनाभूत करणार म्हणून राजरोसपणे धमक्या देऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत.एक वेळा जेसीबी चा वापर करून त्यांच्या अंगणातील झाड पाडून टाकण्यात आले आहे.
अत्यंत गरीब व मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारे पीडित कुटुंब अडचणीत सापडले आहे.
तेव्हा विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूक असल्यामुळे दलित संघटनाचे नेते तळणी कडे फिरकायला तयार नव्हते व ऐन निवडणुकीत आचार संहितेमध्ये आदर्श आचार संहितेचा भंग करीत लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी एका मातंग समाजाचे घर गावातून उठविण्यासाठी आसूसलेले होते.