Neglect of rude officers – employees : ७० वर्षीय मातंग समाजातील वयोवृद्धाचे कडाक्याच्या थंडीत १५ दिवसापासून उपोषण; निष्ठुर अधिकारी – कर्मचारी यांचे दुर्लक्ष -NNL
नांदेड| शहरापासून जवळच असलेल्या मौजे तळणी पोस्ट लिंबगाव ता.जि.नांदेड येथील पीडित मातंग समाजातील ७० वर्षीय वयोवृद्ध श्री व्यंकटी भिवाजी डोंपले हे मागील १५ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसून आहेत. ते मुजोर प्रशासना विरुद्ध एकाकी झुंज देत आहेत. त्यांनी दि.३० ऑक्टोबर पासून स्वगृही मौजे तळणी येथे ५ दिवस उपोषण केले आहे. व्यंकटी भिवाजी डोम्पले हे वयोवृद्ध मागील ३० ते ४० वर्षांपासून तळणी येथे जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला घर बांधून रहातात.
त्यांच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व व्यक्ती अशिक्षित आहेत. कुटुंबातील एकूण १० ते १२ जणांचे वास्तव्य तेथे आहे. ते रहात असलेली जमीन ही सरकारी आहे. त्यांच्या घराला चिटकून इतर दोन सवर्णाची घरे आहेत. त्यांना धक्का न लावता डोम्पले यांचे घर ऐन आचार संहितेमध्ये उठविण्याचा कट गावातील सरपंच, ग्रामसेवक, माजी सरपंच,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व इतर शि...
