श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर गडावरील प्रमुख यात्रे पैकी एक असलेल्या दत्त जयंतीच्या काळात नांदेड स्थागुशाच्या पथकाने दत्तमंदीर परीसरात सतर्कपणे पेट्रोलींग करत असतांना दोन आरोपी संशयीतरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या आरोपीतांना ताब्यात घेवून चौकशी अंती २,७५,८०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुण माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
दत्त जयंती निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारो भाविक दर्शनासाठी दत्त शिखर माहूरला येत असतात अशावेळी यात्रा काळात गर्दीचा फायदा घेवुन चैन स्नॅचींग करणारे, पॉकीट मार,जबरी चोरी करणारे मोठ्या संख्येने दाखल होत असतात अशा आरोपीतांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नांदेड अबिनाश कुमार, यांचे ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार नांदेड जिल्हयातील माली गुन्हे करणारे गुन्हेगांरावर वॉच ठेवून त्यांना अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते. त्याच आदेशाचे पालन करीत दि.१४ डिसे.रोजी दत्तशिखर येथे दत्तजंयती बंदोबस्त व पेट्रोलींग कामी स्थानिक गुन्हे शाख्येच्या पथकास दोन आरोपी अभि बालाजी कांबळे ( वय २४ वर्ष ) रा. अण्णाभाऊ साठे नगर, इंदापुर जि. पुणे व करण नारायण दिनकर ( वय २५ वर्ष ) रा. कसबा ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर हे संशयीतरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले.
स्थागुशा पथकातील पोलीस निरीक्षक उदय खंडेराय,ग्रेड पोलीस उप निरीक्षक गोविंद मुंडे,पोलीस अमलंदार पोहेकॉ/सखाराम नवघरे, सुरेश घुगे, रुपेश दासरवार, संजिव जिंकलवाड, भिमराव लोणे यांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अपर पोलीस अधीक्षक भोकर,खंडेराव धरणे,अपर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील संशयीत आरोपीतांची चौकशी करुण त्यांचेकडुन ३९ ग्राम ४०० मिलीग्राम सोन्याचा पोहे हार किंमत २,७५,८००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद दोन्ही आरोपीताविरुध्द पोलीस ठाणे माहुर येथे गुरनं. १७५/२०२४ कलम १२४ म. पो. का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.