Thift Arested ; दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे सोन्याचे दागीने चोरणारे दोन आरोपी अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर गडावरील प्रमुख यात्रे पैकी एक असलेल्या दत्त जयंतीच्या काळात नांदेड स्थागुशाच्या पथकाने दत्तमंदीर परीसरात सतर्कपणे पेट्रोलींग करत असतांना दोन आरोपी संशयीतरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या आरोपीतांना ताब्यात घेवून चौकशी अंती २,७५,८०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुण माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
दत्त जयंती निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारो भाविक दर्शनासाठी दत्त शिखर माहूरला येत असतात अशावेळी यात्रा काळात गर्दीचा फायदा घेवुन चैन स्नॅचींग करणारे, पॉकीट मार,जबरी चोरी करणारे मोठ्या संख्येने दाखल होत असतात अशा आरोपीतांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नांदेड अबिनाश कुमार, यांचे ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार नांदेड जिल्हयातील माली गुन्हे करणारे गुन्हेगांरावर वॉच ठेवून त्यांना अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते. त्याच आदेशाचे...
