नांदेड| अर्जापूर ता.बिलोली येथील हुतात्मा पानसरे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा मराठवाड्यातील ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.डॉ.किरण देशमुख (७२) यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते.
हुतात्मा गोविंदराव शिक्षण प्रसारक मंडळाच्या पानसरे महाविद्यालय अर्जापूर ता.बिलोली येथील महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.किरण देशमुख यांचे पुणे येथे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रियाही झाली होती. गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्येत ठिक नव्हती. मराठवाड्यातील शिल्पकलेचा अभ्यास, इतिहास संशोधन यावर त्यांनी प्रचंड लिखान केले होते.
शिल्पातील सौंदर्य व मराठवाड्याच्या शिल्पकलेचा इतिहास यावर त्यांची महाराष्ट्रभर व्याख्यानेही झाली होती. शिल्पातील सौंदर्य, त्यातील बारकावे, भारतीय संस्कृती तसेच धार्मिक, अध्यात्मिक परंपरा, रितीरिवाज, बोली व स्त्रि-पुरुषातील अलौकीक अशा प्रेमाचे सौंदर्यपूर्वक प्रतिबिंब जे शिल्पामध्ये आपल्याला दिसते. त्या गोष्टी त्यांनी सप्रयोग अनेक ठिकाणी व्याख्याने दिली.
मराठवाड्यात व विदर्भात ज्या ज्या ठिकाणी उत्खनन होताना नविन शिल्पे व मूर्त्या सापडल्यानंतर ते स्वतः तेथून जावून निरीक्षण करायचे त्याच्यावर संशोधात्मक लिखान करायचे. डॉ.किरण देशमुख हे पीएचडीचे गाईड असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थी व प्राध्यापक वृंद तयार झाला. त्यांच्या वेगवेगळ्या व्याख्यान व लिखाणामुळे महाविद्यालयाचा नावलौकीक झाला. आज सकाळी ११ वाजता पुण्याच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.