HomeकरियरGangadhar Rathod ; आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर सर्व मतदारांना मतदान...

Gangadhar Rathod ; आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा – गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड – NNL

किनवट, परमेश्वर पेशवे | आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर आपण व परिवारातील सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा. मतदान न केल्याने चुकीच्या व्यक्ती सत्तेत बसतात. तेव्हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या राज्याच्या व देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीला देखील आपलं ऐकावं लागेल यासाठी प्रत्येकांनी मतदान करावे. असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांनी केले.

८३- किनवट मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली येथील बळीराम पाटील महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच्या शुभारंभी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्राचार्य डॉ.एस.के. बेंबरेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी संपादक साजीद बडगुजर , पत्रकार आशिष देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वीप कक्षाचे शाहीर प्रो.डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी पोवाडा सादर केला. गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांनी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मतदान शपथ दिली.

IMG 20241023 WA0062 Gangadhar Rathod ; आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा - गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड - NNL

याप्रसंगी स्वीप कक्षाचे सर्व सदस्य केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , रुपेश मुनेश्वर , भूमच्या इंदुरवार , सुरेश पाटील , सारंग घुले, सचिन कोंडापलकुलवार , सूरज पाटील , यांचे सह डॉ.शुभांगी दिवे, डॉ.सुलोचना जाधव, प्रा.शेषराव माने, डॉ.लता पेंडलवाड, डॉ.गजानन वानखेडे, डॉ.स्वाती कुरमे, प्रा.अनिल पाटील, प्रा. ज्ञानेश्वर चाटे , प्रा.मुकाडे, प्रा.अनिल मुंढे, कार्यालयीन अधीक्षक यमुना कुमरे, दीपक खंदारे, मिलिंद लोकडे, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. स्वीप कक्षाचे सदस्य उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमास नवमतदांसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments