Gangadhar Rathod ; आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा – गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे | आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर आपण व परिवारातील सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा. मतदान न केल्याने चुकीच्या व्यक्ती सत्तेत बसतात. तेव्हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या राज्याच्या व देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीला देखील आपलं ऐकावं लागेल यासाठी प्रत्येकांनी मतदान करावे. असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांनी केले.
८३- किनवट मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली येथील बळीराम पाटील महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच्या शुभारंभी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्राचार्य डॉ.एस.के. बेंबरेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी संपादक साजीद बडगुजर , पत्रकार आशिष देशपांडे य...
