HomeनांदेडDhammachakra Pravartan Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात...

Dhammachakra Pravartan Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

हिमायतनगर| धम्मचक्र प्रर्वतनदिनाच्या निमित्ताने येथील बौद्ध अनुयायांनी शहरातील मुख्य रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह पंचरंगी ध्वज असलेल्या वाहनांची डीजेच्या तालावर भव्य शोभा यात्रा काढली होती.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाजबांधवानी येथील नालंदा बौद्ध विहारांमध्ये अनेक उपासक-उपासिकांनी त्रिशरन पंचशिल गृहन करुन ध्वजारोहन केले. आणि एक दुसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभकामना दिल्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढली. दुपारी १२ वाजता निघालेली शोभा यात्रा शहरातील ठिकठिकाणच्या चौकात येताच अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. 

IMG 20241012 154534 Dhammachakra Pravartan Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा - NNL

मोठ्या प्रमाणात बालक, युवक, युवतींनी मिरवणुकीत सामील होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. शहरातील परमेश्वर मंदिर मैदानात येताच फुलांची उधळण करत मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. तसेच ग्रामीण भागात देखील धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथे अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी युवकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. या मिरवणुकीत शेकडो महिलां – पुरुषांसह युवकांनी सहभाग घेतला. मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.

IMG 20241012 154551 Dhammachakra Pravartan Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा - NNL

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments