नवीन नांदेड| विजया दशमी दसरा निमित्ताने हडको परिसरातील वाघाळा पाटी नजीक आयोजक तथा नांदेड शहर भाजपा उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भाजपा खासदार अशोकराव चव्हाण , खासदार अजित गोपछडे,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सह मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आले असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भाजपा शहर नांदेड उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या वतीने हडको वाघाळा परिसरात गेल्या दहा दिवसांपासून हिंगोली येथील कलाकार रवी ऊसांडे यांच्या सहाय्याने ३१फुट दहा तोंडी रावण तयार करण्यात आले आहे. विजया दशमी दसरा निमित्ताने सायंकाळी सात वाजता माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, देविदास राठोड,चैतन्य बापु देशमुख, प्रविण साले,जनार्दन ठाकुर,संतोष वर्मा,विरोधी पक्षनेते दिपक रावत,प्रविण पाटील चिखलीकर ,सौ.प्रणिताताई देवरे, माजी नगरसेवक राजु गोरे, माजी नगरसेविका शांताबाई गोरे,
माजी नगरसेविका इंदुबाई घोगरे, सौ.बेबीताई जनार्दन गुपीले, माजी नगरसेविका प्रा.ललिता शिंदे,माजी नगरसेवक राजू पाटील काळे,संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड,संजय मोरे,उदय देशमुख,संजय पाटील घोगरे, सतिश बस्वदे ,भाजपा सिडको मंडळ सचिन रावका,भाजपा पक्षाचे विविध आघाडी पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा रावण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक वैजनाथ देशमुख यांनी केले आहे.