छत्रपती संभाजीनगर। शहरात 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ऐतिहासिक धम्मभुमी बौद्ध लेणी बचाव महामोर्चा निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे आंबेडकरवादी बहुजन विकास समिती अध्यक्ष दिपक मगनराव निकाळजे व तमाम कार्यकर्त्यांनी केली आहे.
आज समस्त बौद्ध, आंबेडकरी अनुयायांच्या वतीने व आंबेडकरवादी बहुजन विकास समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने जाहिर निवेदन देन्यात आले की, छ.संभाजीनगर शहरातील बौद्ध लेणीच्या पायथ्याशी असणाऱ्या धम्मभुमी बुध्दलेणी विपश्यना बुद्ध विहार येथे मागील 60 ते 70 वर्षापासून अस्तित्वात आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखों करोडो बौद्ध अनुयायी श्रद्धेने नथमस्तक होतात. लेण्यांच्या निर्मितीपासून पायथ्याशी बौद्ध भिक्खूंचे वास्तव्य येथे राहिले आहे यामुळे या बौद्धलेणी परीसराला प्रती दिक्षाभुमी म्हणुन संबोधले जाते.
परंतु प्रशासनाने वारंवार हे जागतीक वारसास्थळ हे अतिक्रमणीत दाखवुन तोडण्याची नोटीस दिल्याने समस्त बौद्ध आंंबेडकरी अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम येथील प्रस्थापित राजकिय मंडळी ही प्रशासनास हाताशी धरुन करीत आहे. यामुळे समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असुन या घटनेचा निषेध म्हणुन व ऐतिहासिक धम्मभूमी-बौद्धलेनीला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळावा. या स्थळाची बुध्दीस्ट सर्किट मधे याची नोंद करण्यात यावी.
अजिंठा बौद्ध लेणीला जाणार्या हर्सुल टी पाॅंईट मुख्य चौकात तथागत गौतमबुद्ध यांचा भव्य पुतळा बसविण्यात यावा व ईतर अनेक सामाजिक जिव्हाळ्याच्या मागण्या घेवुन 7 ऑक्टोंबरला शहरात क्रांतिचौक येथुन विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय भिक्खु संघच करणार असल्याने व बौद्ध आंंबेडकरी समाजाच्या अस्मितेचा विषय असल्याने ऐतिहासिक धम्मभूमी-बौद्धलेनी बचाव महामोर्चात महाराष्ट्र राज्याच्या विवीध शहर जिल्ह्यांतुन शहरात दोन लाखांहुन जास्त बौध्द अनुयायी सामिल होणार आहे.असे जाहीर पत्रकार परिषद घेवुन भिक्खु संघाने जाहीर केले आहे.
या दिवशी शहरात व परीसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व वाहतुकिचे नियोजन सुरळीत करण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार या महामोर्चा दरम्यान घडु नये व नियोजित ऐतिहासिक महामोर्चा शांततेत व सुरळीत पार पडावा. यासाठी प्रशासनाने शहरात दि.13/7/24 रोजी जरांगे पाटील यांच्या आंदोलना दरम्यान मा.जिल्हाधिकारी कार्यालय छ.संभाजीनगर यांचे आदेश जा.क्र.2023/सा.प्र./प्रशासक/म.आ./कावी-448 नुसार शहरात दिलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या धर्तीवर शहरात निघणार्या लाखों बौद्ध आंंबेडकरी अनुयायांच्या ऐतिहासिक धम्मभूमी-बौद्धलेनी बचाव महामोर्चा निमित्त शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय तसेच सर्व औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या अस्थापना बंद ठेवुन सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी.
या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना रीतसर जाहीर निवेदन देण्यात आले व महामोर्चास आता खुप कमी दिवस बाकी राहील्याने यावर तात्काळ निर्णय घ्यावा. यामुळे शहरातील विद्यार्थी कामगार नागरीकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.अशी भुमिका यावेळी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या पदाधिकार्यांनी घेतली. यावर लवकरच वरीष्ठांशी चर्चा करुण लवकरच निर्णय कळवला जाईल असे मा.उपजिल्हाधिकारी विनोद खिरोलकर यांनी समितीच्या पदाधिकार्यांना सांगितले आहे. यावेळी दिपक निकाळजे, आनंद कस्तुरे,मुकेश खोतकर,अमित वाहुळ,नागेश केदारे, संदेश कांबळे,आनंद बोर्डे, संतोष चव्हाण,प्रांतोश वाघमारे,नितिन निकाळजे,दादाराव सोनट्टके व आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्खेने उपस्थित होते.